ETV Bharat / state

Mumbai Crime News : नोकरी देण्याच्या आमिषानं भामट्यांकडून फसवेगिरी; सीबीआयनं आंतरराज्यीय बनावट जॉब रॅकेटचा केला पर्दाफाश, तीन अटकेत - सिक्युरिटी डिपॉझिट

Mumbai Crime News : अंधेरीतील साकीनाका परिसरात सीबीआयनं मोठ्या आंतरराज्यीय बेकायदेशीर आणि बनावट जॉब रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तसंच या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

CBI
सीबीआय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 10:10 AM IST

मुंबई Mumbai Crime News : सीबीआयनं अनेक राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या अवैध जॉब रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तसंच याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या आरोपींची मोडस ऑपरेंडी ही केंद्र सरकारच्या विविध विभागांतील पदांसाठी परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना संपर्क साधून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळं याप्रकरणी सीबीआयनं सहा आरोपी अन् इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

काय आहे प्रकरण : भामट्यांची ही टोळी प्रक्रिया शुल्क आणि सुरक्षा ठेवींच्या नावाखाली केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि पीएसयूएसमधील संभाव्य नोकरी शोधणार्‍या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होती. पुढं असा आरोप करण्यात आला की, विविध आरोपींचे अनेक स्तर होते, जे अशा प्रकारे काम करत होते. नोकरी शोधणाऱ्या तरुणांकडून सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) परत करण्यासाठी किंवा नोकरीच्या कोणत्याही प्रकारची माहिती देण्यासाठी पुढील टप्प्यातील आरोपीशी संपर्क करू शकत नसे. मात्र तरीही सीबीआयनं आरोपींचा शोध घेत ही कारवाई केली आहे.

नोकरी शोधणार्‍या तरुणांना दिलं प्रशिक्षण : बनावट नियुक्तीपत्रे, विविध केंद्रांवर बनावट प्रशिक्षणासाठी कॉल लेटर, बनावट प्रशिक्षण केंद्रांवर उमेदवारांची बनावट कागदपत्रं देण्याची संपूर्ण यंत्रणा आरोपींनी विकसित केल्याचा आरोपही सीबीआयनं केला आहे. आरोपींनी नोकरी शोधणार्‍या तरुणांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रशिक्षण केंद्रं स्थापन करण्याची व्यवस्था असल्याची बतावणी केली. त्यांची कार्यपद्धती दाखवून देण्यासाठी नोकरी शोधणार्‍या तरुणांना प्रशिक्षण दिलं. त्यानंतर नोकरी शोधणाऱ्यांना नियुक्ती पत्रे देण्यासाठी प्रत्यक्ष सरकारी कार्यालयांच्या आवारात बोलावण्यात आलं.

साकीनाका येथील दोन बनावट प्रशिक्षण केंद्रांचा समावेश : पाटणा, मुंबई, बंगळुरू, मंगळुरू आणि धनबाद येथील नऊ ठिकाणी झडती घेण्यात आली. ज्यामध्ये मुंबईतील साकीनाका येथील दोन बनावट प्रशिक्षण केंद्रं आणि पाटणा (बिहार) येथील बनावट प्रशिक्षण केंद्राचा समावेश आहे. इथं केंद्र सरकारचे विविध विभाग जसे FCI, रेल्वे, जीएसटी इत्यादी तथाकथित नोकऱ्यांसाठी खोट्या नियुक्ती करुन पीडितांना बनावट प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. Scams With Job Lures: परदेशात नोकरी देण्याचे अमिष दाखवून 300 हून अधिक जणांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
  2. Police Bharati Scam: पोलीस शिपाई भरती परीक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्यांना 10 जणांना अटक, रॅकेटचा 'असा' झाला पर्दाफाश
  3. Mumbai Crime News: नोकरीच्या फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस, आरोपीला उत्तर प्रदेशातून केले अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.