ETV Bharat / state

खारमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 12 महिलांसह 45 जणांना अटक - जुगार अड्डा रेड

Illegal Gambling Mumbai : मुंबईतील खार परिसरात शुक्रवारी रात्री गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने एका निवासी इमारतीवर छापा टाकला. येथे बेकायदेशीरपणे जुगार खेळला जात होता. यावेळी 12 महिलांसह सुमारे 45 जणांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळावरून 34 लाख रुपयांची रोकड आणि जुगार खेळण्यासाठीची एक कोटी रुपयांची नाणी जप्त करण्यात आली आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 9:19 PM IST

मुंबई Illegal Gambling Mumbai : शुक्रवारी(1 डिसेंबर) पोलिसांनी खारमधील (Khar) एका इमारतीमध्ये छापा टाकला होता. यावेळी तब्बल 45 जण जुगार खेळताना आढळून (Illegal Gambling Racket Khar) आले होते. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सर्व ४५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व 45 जणांना अटक केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) दिली.

रहिवाशांनी दिली होती तक्रार : मुंबई पश्चिम उपनगरातील आंबेडकर रोडवर असलेल्या ओम पॅलेस इमारतीतील रहिवाशांनी गुन्हे शाखेकडे जुगार खेळण्याबाबत तक्रार केली होती. जुगारामुळं या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होत होता. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून, 45 जणांना अटक केली आहे. यात 4 जण हा जुगाराचा अड्डा चालवत होते. यावेळी तिथे 12 महिलांसुद्धा उपस्थित होत्या. घटनास्थळावरुन 34 लाख रुपयांची रोकड, 1 कोटी रुपयांची प्लास्टिकची नाणी आणि सट्टा लावण्यासाठी वापरल्या जाणार्‍या वस्तू जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता आणि जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लाखोंचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत 34 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच १ करोड १ लाख ५० हजार किमतीचे जुगार खेळण्याचे कॉईन्स पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात कलम ४ (अ) (ब), ५ जुगार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कक्ष ९ गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

हेही वाचा - धक्कादायक! गर्लफ्रेंडचीहत्या करून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला लावला फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.