ETV Bharat / state

Mumbai Crime News: बनावट शेअर मार्केट चालवणाऱ्या टोळीतील आरोपीला अटक; 4 हजार 672 कोटी रुपयांचे झाले व्यवहार - डब्बा ट्रेडिंग

मूडी ॲपच्या माध्यमातून बनावट मार्गाने शेअर बाजार (डब्बा ट्रेडिंग) चालवणाऱ्या अशाच एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट 11 ने अटक केली आहे. जतीन सुरेश भाई मेहता (45) असे आरोपीचे नाव आहे. संकेत बिल्डिंग महावीर नगर कांदिवली पश्चिम येथील रहिवासी आहे. आरोपींकडून 5 मोबाईल फोन, 2 टॅब, 1 लॅपटॉप, 1 पेपर श्रेडर, 50 हजार रोख रकम, 1 राउटर, 1 पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आला आहे.

Mumbai Crime Branch Unit 11
गुन्हे शाखा युनिट 11
author img

By

Published : Jun 22, 2023, 7:28 AM IST

Updated : Jun 22, 2023, 10:26 AM IST

मुंबई : बनावट शेअर मार्केट चालवणाऱ्या टोळीतील एक आरोपीला गुन्हे शाखा युनिट 11 ने अटक केली आहे. मार्च 2023 ते 20 जून 2023 पर्यंत या बनावट शेअर बाजारातून (डब्बा ट्रेडिंग) 4672 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. ज्यामध्ये सिक्युरिटी ट्रांजेक्शन टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स, स्टेट गव्हरमेन्ट स्टॅम्प ड्युटी टॅक्स, सेबी टर्नओव्हर टॅक्स, स्टॉक एक्स्चेंज ट्रेडिंग रेव्हेन्यू यातून शासनाची 1 कोटी 95 लाख 64 हजार 888 रुपयांची फसवणूक झाली आहे.

आरोपी स्टॉक एक्स्चेंजची कोणतीही परवानगी न घेता मूडी ॲप्लिकेशनद्वारे रोखीच्या व्यवहारांवर शेअर बाजार चालवत होता. - राज तिलक रौशन, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

मूडी ॲप्लिकेशनद्वारे अवैधरित्या ट्रेडींग : 20 जून रोजी मुंबई कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक व्यक्ती हा ऑफीस नं. 5, संकेत बिल्डीग, महाविर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई या ठिकाणी स्टॉक एक्सचेंजचा कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना मूडी ॲप्लिकेशनद्वारे अवैधरित्या ट्रेडींग करत आहे. त्यासाठी लागणारा कुठलाही कर न भरता शासनाची फसवणुक करीत आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या पथकाने सापळा रचून दोन पंचासमक्ष छापा कारवाई केली. या ठिकाणी आरोपीकडे जप्त मुद्देमालासह मिळुन आला. नमुद रक्कमेवर सिक्युरीटी ट्रान्झेक्शन टॅक्स, कॅपीटल गेन टॅक्स, स्टेट गव्हर्नमेंट स्टॅप ड्युटी टॅक्स, सेबी टर्नओव्हर फी, स्टॉक एक्सचेंज ट्रेडींग रेव्हेन्यु यांचे 1,95,64,888 रुपयांचा महसुल बुडवुन शासनाची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले.

4672 कोटींचा टर्नओव्हर : या आरोपीकडे ट्रेडींग करण्यासाठी स्टॉक एक्सचेंजचा कुठलाही परवाना घेतलेल्या नसल्याचे आढळुन आले. हा आरोपी मुडी या ॲप्लिकेशनमार्फत ट्रेडींगचे सर्व सौदे हे रोख स्वरुपात घेतो. त्याबदल्यात सरकारला कुठल्याही प्रकारचा कर भरत नाही. आरोपीच्या लॅपटॉपची पाहणी करुन त्यामधील ट्रेडींगच्या व्यवहार पाहीले. त्यामध्ये मार्च 2023 ते दिनांक 20 जून पर्यंतच्या स्टॉक एक्सचेंज बाहेरील शेअर्स खरेदी विक्रीचा टर्नओव्हर काढला असता तो 4672 कोटी रुपयाचा आढळुन आला.

हेही वाचा :

  1. Suspicious Bag In Dadar : दादर फुलबाजारात संशयास्पद बॅग आढळल्याने पोलिसांची तारांबळ; बॅगेत आढळला गांजा
  2. Aryan Khan Bribery Case : समीर वानखेडे कथित खंडणी प्रकरणी सीबीआय शाहरूख खान, आर्यन खानचा जबाब नोंदवण्याच्या तयारीत
  3. Pune Crime News: पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच; दुसऱ्या दिवशी तळजाई परिसरात 30 गाड्या फोडल्या

Last Updated : Jun 22, 2023, 10:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.