ETV Bharat / state

बिहार पोलीस अधिकारी विनय तिवारी यांना नियमानुसारच क्वारंटाईन केले ; मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण

राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक असल्याचे पालिकेने त्यांना कळविले आहे.

author img

By

Published : Aug 3, 2020, 11:43 AM IST

मुंबई महापालिकेचे स्पष्टिकरण
मुंबई महापालिकेचे स्पष्टिकरण

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग यांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यास आलेले आयपीएएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाईन केले आहे. या प्रकारावरून राजकारण तापले असताना पालिकेने विनय तिवारी यांना केलेल्या क्वारंटाईनबाबत खुलासा केला आहे. तिवारी यांनी विमान प्रवास केला असल्याने त्यांना नियमानुसार क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांना त्यामधून सूट मिळवण्यासाठी पालिकेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा असे सांगण्यात आल्याची माहिती तिवारी यांना दिली असल्याचे पालिकेने कळविले आहे. बिहारमधून आलेले पोलीस अधिकारी मुंबईतील गोरेगांव (पूर्व)मधील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) ग्रूप ८ विश्रामगृहात मुक्कामी आले असल्याची माहिती महानगरपालिकेच्या पी/दक्षिण विभाग कार्यालयाकडे प्राप्त झाली. ते देशांतर्गत प्रवासी असल्याने त्यांना कोविड-१९ संदर्भातील राज्य शासनाच्या नियमावलीनुसार गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेचे पथक काल (दिनांक २ ऑगस्ट २०२०) सायंकाळी सदर विश्रामगृहावर पोहोचले.

महानगरपालिकेच्या पथकाने, बिहार येथून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी लागू असलेली गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) बाबतची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. राज्य शासनाचे दिनांक २५ मे २०२० रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/२०२०/सीआर ९२/डिएसएम १ अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या व्‍यक्तींसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून त्यामध्ये गृह अलगीकरणाचादेखील समावेश आहे. त्याची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. त्यासोबतच, त्यांना माहिती देण्यात आली की, राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, गृह अलगीकरणातून सूट मिळण्यासाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडे नियमावलीनुसार अर्ज करणे आवश्यक असल्याचे पालिकेने त्यांना कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.