ETV Bharat / state

मुंबई कोरोना अपडेट : 1 हजार 257 नवे बाधित, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 120 दिवसांवर - mumbai corona death

मुंबईत आज (शनिवार) कोरोनाचे 1257 नवे रुग्ण आढळून आले असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 35 पुरुष तर 15 महिला रुग्ण आहेत.

mumbai corona update
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Oct 24, 2020, 9:46 PM IST

मुंबई - शहरात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. आज(शनिवार) मुंबईत कोरोनाच्या नव्या 1 हजार 257 रुग्णांची नोंद झाली असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चौदा दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 120 दिवस इतका वाढला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

1 हजार 257 नवे रुग्ण

मुंबईत आज (शनिवार) कोरोनाचे 1 हजार 257 नवे रुग्ण आढळून आले असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 35 पुरुष तर 15 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 50 हजार 061 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 016 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 898 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 19 हजार 152 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 554 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 120 दिवसांवर

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 120 दिवस तर सरासरी दर 0.60 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 633 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 8 हजार 585 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 14 लाख 37 हजार 445 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.