मुंबई: मुंबईत रविवारी ९६१ नवे रुग्ण ( Mumbai Corona Update ) तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. ३७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६९ हजार ८५८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४५ हजार ४०९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४८८० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२०४ दिवस इतका आहे.
गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०५७ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ९६१ रुग्णांपैकी ९१७ म्हणजेच ९५ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ५७९ बेड्स असून त्यापैकी १८१ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्णांची नोंद झाली होती. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१ रुग्णांची नोंद झाली आहे.