ETV Bharat / state

Mumbai Corona : २४ पैकी १७ विभागात अधिक, तर २ विभागात कमी रुग्णांची नोंद

author img

By

Published : Jul 21, 2021, 8:48 PM IST

मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. दिवसाला चारशे ते पाचशे नवे रुग्ण आढळून येत आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मुंबईमधील काही विभागात रुग्णसंख्या वाढत आहे. महापालिकेच्या २४ पैकी १७ विभागात रुग्णांची संख्या अधिक आहे.

mumbai
mumbai

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. दिवसाला चारशे ते पाचशे नवे रुग्ण आढळून येत आहेत. नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मुंबईमधील काही विभागात रुग्णसंख्या वाढत आहे. महापालिकेच्या २४ पैकी १७ विभागात रुग्णांची संख्या अधिक आहे. तर सँडहर्स्ट रोडच्या बी व मरीन लाईन्सच्या सी विभागात सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे.

१६ ते १९ जुलै दरम्यान सँडहर्स्ट रोडच्या बी विभागात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. ज्या विभागात जास्त संख्येने रुग्ण आढळून येते आहेत, त्याठिकाणी विशेष लक्ष दिले जात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आठवड्याभरात आढळून आलेले रुग्ण -

मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. यादरम्यान मुंबई कोरोनाची हॉटस्पॉट बनली होती. मुंबईकरांनी कोरोनाच्या दोन लाटा थोपवल्या आहेत. सध्या कोरोना विषाणूचे रुग्ण कमी आढळून येत असले तरी २ ते १९ जुलै दरम्यान महापालिकेच्या २४ पैकी भांडुप एस विभागात 175, बोरिवली आर सेंट्रल 299, गोवंडी मानखुर्द एम ईस्ट 119, एल्फिस्टन जी साऊथ 125, माटुंगा एफ नॉर्थ 149, कुलाबा ए वॉर्ड 84, कांदिवली आर साऊथ 232, बांद्रा एच वेस्ट 134, अंधेरी पूर्व के ईस्ट 216, दादर जी नॉर्थ 129, कुर्ला एल वॉर्ड 129, घाटकोपर एन वॉर्ड 147, अंधेरी पश्चिम के वेस्ट 235, ग्रांट रोड डी विभाग 144, खार एच ईस्ट 100, मालाड पी नॉर्थ 173, मुलुंड टी वॉर्ड 132, गोरेगाव पी साऊथ विभागात 101 रुग्ण आढळून आले आहेत. मरीन लाईन्स येथे 19 तर सँडहर्स्ट रोड येथे 3 रुग्णांची नोंद झाली आहे. मरीन लाईन्स व सँडहर्स्ट रोड येथे सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी -

मुंबईत रुग्ण दुप्पटीचा कालावधी १०६३ दिवस इतका नोंदवण्यात आला आहे. १२ ते १९ जुलै या आठवड्याभराच्या कालावधीत भांडुप एस विभागात 777, बोरिवली आर सेंट्रल 821, गोवंडी मानखुर्द एम ईस्ट 864, एल्फिस्टन जी साऊथ 879, माटुंगा एफ नॉर्थ 149, कुलाबा ए वॉर्ड येथे 935 दिवसांचा रुग्ण दुप्पटीचा कालावधी नोंदविण्यात आला आहे. महापालिकेच्या २४ पैकी १६ विभागात १०३२ ते १७३९ दिवस इतका रुग्ण दुप्पटीचा कालावधी नोंद झाला आहे. सँडहर्स्ट रोड येथील बी विभागात रुग्ण रुग्ण दुप्पटीचा कालावधी ६३३६ इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागांकडे विशेष लक्ष -

मुंबईत ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, अशा भागात आरोग्य विभागाला आणि स्थानिक विभाग कार्यालयांना विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात मजले, इमारती सील करणे, कंटेन्टमेंट झोनची योग्य अंमलबजावणी करणे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून त्यांच्यावर लक्ष ठेवून उपचार करणे, कोरोना नियमांची पालन करणे, मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

१२ ते १९ जुलै आढळून आलेले रुग्ण -

विभागाचे नाव: नवीन रुग्ण एकूण रुग्ण रुग्ण दुपटीचा कालावधी
भांडुप एस विभाग 175 33403 777
बोरिवली आर सेंट्रल 299 50768 821
गोवंडी मानखुर्द एम ईस्ट 119 21252 864
एल्फिस्टन जी साऊथ 125 22709 879
माटुंगा एफ नॉर्थ 149 27324 887
कुलाबा ए वॉर्ड 84 16236 935
कांदिवली आर साऊथ 232 45255 944
बांद्रा एच वेस्ट 134 28573 1032
अंधेरी पूर्व के ईस्ट 216 46405 1040
दादर जी नॉर्थ 129 28653 1075
कुर्ला एल वॉर्ड 129 25669 1081
घाटकोपर एन वॉर्ड 147 33393 1100
अंधेरी पश्चिम के वेस्ट 235 54676 1126
ग्रांट रोड डी विभाग 144 34228 1151
दहिसर आर नॉर्थ 93 22326 1162
चेंबूर एम वेस्ट 95 23234 1184
खार एच ईस्ट 100 24823 1202
मालाड पी नॉर्थ 173 44190 1237
मुलुंड टी वॉर्ड 132 34449 1264
परेल एफ साऊथ 74 20346 1332
भायखळा ई 75 20944 1353
गोरेगाव पी साऊथ 101 33605 1612
मरिन लाईन्स 19 6821 1739
सँडहर्स्ट रोड 3 3919 6336

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासूनच पॉर्न फिल्मचे शुटिंग, नाना पटोलेंचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.