मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. मुंबईत रविवारी (4 जुलै) नव्या 548 जणांना कोरोना झाला आहे. नवीन 24 मृत्यूची नोंद झाली आहे. तर 705 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला आहे.
मुंबईची एकूण रुग्णसंख्या -
मुंबईत आज 548 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 24 हजार 678 वर पोहोचला आहे. आज 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 544 वर पोहोचला आहे. आज 705 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 98 हजार 696 वर पोहोचली आहे.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 767 दिवसांवर -
मुंबईत सध्या 8 हजार 114 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 767 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 14 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 66 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 37 हजार 128 तर आतापर्यंत एकूण 72 लाख 92 हजार 446 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
अशी होतेय रुग्णसंख्या कमी -
1 मे - 3908, 9 मे - 2403, 10 मे - 1794, 17 मे - 1240, 25 मे - 1037, 28 मे - 929, 8 जून - 673, 10 जून - 660, 11 जून - 696, 14 जून - 529, 15 जून - 575, 16 जून - 830, 21 जून - 521, 22 जून - 570, 4 जुलै - 548 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं; दुसऱ्या लाटेत चौथ्यांदा, तर आतापर्यंत दहा वेळा शून्य रुग्णांची नोंद