मुंबई : कुठल्याही बालकाला दत्त घेत असताना त्यातील कागदपत्रंची पूर्तता करणे हे अत्यंत अनिवार्य आहे. परंतु या कागदपत्रांमध्ये कोणताही संशय येणार नाही, अशा रीतीने कायद्याचे नियम आहे. मात्र त्या नियमांचे पालन झाले नाही तर संबंधित यंत्रणा किंवा न्यायालय ती दत्तक प्रक्रिया रोखू शकते. ही बाब मुंबईतील एका घटनेतून समोर आली. न्यायालयाने आता या दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला चार आठवड्यांची संगती दिलेली आहे. ज्या लहान बाळाला ते जोडपे दत्तक घेत होते त्या बाळाला त्याच्या आईकडे देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
चार आठवड्यांची स्थगिती : दिवाणी न्यायालयाने चार आठवड्यांची स्थगिती देताना म्हटले की, प्रतिवादी अर्थात दत्तक घेणारे जोडपे पालक हे दत्तक घेताना मूल देणे आणि घेणे यासंबंधी तथ्य स्थापित करण्यासाठी विश्वसनीय आणि संदेश देणारे पुरावे देऊ शकले नाहीत. अशा परिस्थितीत, केवळ मुलाचा ताबा मूल दत्तक म्हणून कसा काय देता येऊ शकतो. जोपर्यंत विश्वसनीय सत्य आणि खरी माहिती प्राप्त होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया कशी काय पूर्ण होऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे. सबब जन्म देणाऱ्या आईकडे त्या बाळाला पुन्हा परत करा असे म्हणत न्यायालयाने दत्तक घेणाऱ्या जोडप्यांना एक प्रकारे फटकारलेले आहे.
न्यायालयात याचिका दाखल : दत्तक पालकांनी बाळाच्या आईच्या या याचिकेला विरोध केला होता आणि असे सादर केले की, त्यांनी मूल दत्तक घेतले आहे. मात्र गेल्या वर्षी फर्नांडिस यांच्यावर कथित सहाय्यक शबाना शेख हिच्यासोबत एक गुन्ह्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवजात मुलीला 4 लाख 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तेव्हा बाळाची आई पुढे म्हणाली की, दत्तक पालकांनी 2021 मध्ये न्यायालयात दत्तक याचिका दाखल केली. मात्र बाळाच्या आईने तिच्या पतीला सांगितले आणि तिने न्यायालयाला कळवले की, त्यांना त्यांचे मूल दत्तक द्यायचे नाही. मग मूल दत्तक घेण्यासाठी कोण कशी काय सक्ती करू शकता असे देखील बाळाच्या आईने आपल्या याचिकेमध्ये नमूद केलेले आहे.
न्यायालयामध्ये दत्तक घेणाऱ्या जोडप्यांची याचिका फेटाळली : बाळाच्या आईने याचिकेमध्ये हे देखील नमूद केलेले आहे की, जेव्हा मार्च 2022 मध्ये न्यायालयामध्ये दत्तक घेणाऱ्या जोडप्यांची याचिका फेटाळली गेली होती. तरी देखील ते दत्त घेण्याचा प्रयत्न करत होते आणि आम्हाला जर त्यांच्या बाबत परिपूर्ण माहितीची खात्री होत नाही, तोपर्यंत आम्ही कसा काय त्याचा विचार करणार. माझ्या पतीला मी सांगितले की, आपल्याला मूल दत्तक द्यायचे नाही तरी ते कसे काय या संदर्भात पूर्ण प्रक्रिया न करता मूलाचा ताबा घेऊ शकता त्यासाठी पोलिसांकडे संपर्क देखील साधला होता.
बाळाची काळजी घेण्यास एनजीओ मदत करेल : बाळाच्या आईने म्हटले होते की, वैयक्तिक आणि आर्थिक अडचणींमुळे ती बाळाचे संगोपन नीट नेमके करू शकली नाही. तिला ज्युलिया फर्नांडीजशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला होता. बाळाच्या आईने सांगितले की, ज्युलियाने तिला सांगितले की तिच्या संपर्कात एक एनजीओ आहे. परिस्थिती सुरळीत होईपर्यंत बाळाची काळजी घेण्यास एनजीओ मदत करेल. ती मुलाला परत घेण्याच्या स्थितीत आहे.
दत्तक पालकांनी स्थगितीची मागणी केली : बाळाच्या आईने सांगितले की, ज्युलियाने तिच्या बाळाला दत्तक घेण्यास मदत केली आणि तिला सांगितले की, दत्तक जोडपे श्रीमंत आहे. त्याची चांगली काळजी घेईल. दत्तक पालकांनी दाखल केलेली दत्तक याचिका यापूर्वी फेटाळण्यात आली होती, असेही न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. मूल दत्तक घेताना प्रत्यक्ष देणे आणि घेणे हे सध्याच्या प्रकरणात सिद्ध झालेले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. बाळाच्या आईने मूल आपल्या ताब्यात असावा अशी याचिका केली त्या वेळेला दत्तक पालकांनी स्थगितीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
जोडप्यांनी दत्तक घेण्यासाठी अर्ज केला : बाळाच्या आई ही अविवाहित होती आणि ज्याच्यापासून तिला बाळ झालेले आहे तो सुरुवातीला लग्न करायला तयार नव्हता. मात्र तो लग्न करायला तयार झाला. दरम्यान जोडप्यांनी दत्तक घेण्यासाठी त्या बाळासाठी अर्ज केला, परंतु बाळाच्या आईला हे लक्षात आले की ज्याच्यापासून हे बाळ जन्माला आले आहे, तो आता लग्न करायला तयार आहे तर मी का म्हणून त्या जोडप्यांना हे दत्तक म्हणून द्यावे. ही अविवाहित बाळाच्या आईची बाब न्यायालयाने अखेर उचलून धरली.
हेही वाचा : Umesh Pal Murder Case : उमेश पाल खून प्रकरणातील शूटरला अटक, पोलिसांकडून मात्र अद्याप पुष्टी नाही