ETV Bharat / state

Mumbai Children Trafficking : पदपथावर झोपलेल्या मुलीचं अपहरण; पोलिसांनी आवळल्या सहा तस्करांच्या मुसक्या, न्यायालयानं सुनावली कोठडी - कुरार पोलिसांनी सहा तस्करांच्या मुसक्या आवळल्या

Mumbai Girl Kidnapped : गणेश उत्सव काळात पदपथावरुन दोन वर्षीय चिमुकलीचं तस्करांनी अपहरण केलं होतं. या प्रकरणी कुरार पोलिसांनी सहा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

Mumbai Girl Kidnapped
पोलिसांनी आवळल्या सहा तस्करांच्या मुसक्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 8:25 AM IST

मुंबई Mumbai Girl Kidnapped : पदपथावर झोपलेल्या नागरिकांच्या दोन वर्षीय चिमुकल्या मुलीचं गणेश उत्सवादरम्यान अपहरण करण्यात आलं होतं. या मुलांची तस्करी करुन त्या बालकांची विक्री करणाऱ्या सहा तस्करांच्या कुरार पोलिसांनी मुसक्या ( Mumbai Girl Kidnapped ) आवळल्या आहेत. इरफान फरखान खान, सलाहुद्दीन नुरमोहम्मद सय्यद, आदिल शेख खान, तौफिर इक्बाल सय्यद, रझा अस्लम शेख आणि समाधान जगताप असं अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावं आहेत. त्यांना न्यायालयानं 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. मात्र कोठडी संपल्यानं त्यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

गणेश उत्सवात केलं होतं मुलीचं अपहरण : कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुलाखाली झोपलेल्या नागरिकांच्या दोन वर्षीय चिमुकलीचं 28 सप्टेंबर रोजी मध्यरात्री अपहरण केलं होतं. त्याच दिवशी मुंबईत गणेश विसर्जन मिरवणूक होती. त्याचा फायदा घेत तस्करांनी अपहरण केलं होतं. मात्र त्यानंतर 12 तासानं ही मुलगी दादर रेल्वे स्थानकावर सापडली होती. या प्रकरणी चिमुकलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन कुरार पोलीस गुन्हा दाखल करुन शोध घेत होते.

कुरार पोलिसांनी अशा आवळल्या बाल तस्करांच्या मुसक्या : कुरार पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं तस्करांचा शोध घेतला. यातील आरोपींच्या मागावर पोलीस होते. त्यानंतर पोलिसांनी चार तस्करांच्या मालवणी इथून मुसक्या आवळल्या. तर एका आरोपीला मुलुंड इथून अटक केलं. एक आरोपी नाशिक इथं पळाल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यानं दिली होती. त्यामुळे त्या आरोपीच्या नाशिक इथून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या तस्करांनी पोलिसांच्या भीतीनं मुलीला दादर रेल्वे स्थानकावर सोडून दिल्याचं यावेळी त्यांनी पोलीस तपासात सांगितलं.

बाल तस्करी करुन विकायचे मूल : कुरार पोलिसांनी अटक केलेले सहा तस्कर हे बालकांचं अपहरण करुन ते ज्यांना मूल नाही, अशा नागरिकांना विक्री करायचे. त्यामुळे या आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सहाही तस्करांना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना न्यायालयानं 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना कोठडी संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

  1. Thane Crime News: पोलिसांनी चिमुकल्याला पोहोचवले सुखरूप आईच्या खुशीत; अपहरण करून झारखंडमध्ये विक्री करणाऱ्या त्रिकुटाला ठोकल्या बेड्या
  2. Navi Mumbai kidnapping News: वडापावचं आमिष दाखवून 4 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण; 48 तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.