मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मुंबईत पाकिस्तान, बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी चेंबूर विभागातून 70 बस आणि लोकल ट्रेनमधून शेकडो कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
मोर्चासाठी राज्यभरातून मनसेचे नेते, कार्यकर्ते मुंबईत खासगी बसेस, रेल्वेने येत आहेत. या मोर्चाद्वारे मनसे प्रमुख राज ठाकरे सरकारवर दबाव टाकणार असल्याचे बोलले जात आहे. मोर्चानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. सकाळी चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून शिवरायांचा जयघोष करत कार्यकर्ते मुंबईतील मोर्चासाठी रवाना झाले.
हेही वाचा - आमच्या मोर्चावर काय बोलता? संपूर्ण सरकारच राष्ट्रवादी 'स्पॉन्सर'