ETV Bharat / state

कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने कसली कंबर; पालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण - कोरोना लसीकरण मुंबई न्यूज

कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच कोरोना लस साठवण्यासाठीही मुंबई महानगरपालिकेनं तयारी केली आहे.

mumbai-bmc-preparation-for-vaccination
mumbai-bmc-preparation-for-vaccination
author img

By

Published : Dec 22, 2020, 10:11 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूवरील लसीकरणाची पूर्वतयारी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून वेगाने करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या कृती दलाची (टास्क फोर्स)ची पहिली बैठक पडली. मुंबईतील ८ रुग्णालयत लसीकरण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

पोलीस बंदोबस्तात लस वाहतूक -

मुंबईत नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वितरण यंत्रणा लस वितरणासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच मध्यवर्ती लससाठा शीतगृहापासून लसीकरण केंद्रापर्यंत लस वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्त अंतर्गत अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत.

कोरोना लसीकरणासाठी मुंबई महापालिकेने कसली कंबर; पालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

कांजूरमार्ग येथे कोल्ड स्टोरेज -

कोविड १९ लसीकरणासाठी एस विभागातील कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा ही केंद्रीकृत ठिकाणी लसीची साठवणूक करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही कोविड स्टोरेज सुविधा विकसित करण्यात येत असून त्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. कोल्ड स्टोरेज सुविधा तयार करताना भारत सरकारच्या मानांकनानुसार कामगिरी, गुणवत्ता, सुरक्षितता आदींचे निकष समितीकडून वेळोवेळी परीक्षण करण्यात येईल.

तांत्रिक समिती -

कोल्ड स्टोरेजसाठी आवश्यक तांत्रिक समितीची स्थापना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. या समितीमध्ये नॅशनल कोल्ड चेन रिसर्च सेंटरमधील तांत्रिक तज्ज्ञ तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील इतर तज्ज्ञ आणि यांत्रिकी व विद्युत विभागातील प्रतिनिधी कार्यरत आहेत.

येथे होणार लसीकरण -

सुरुवातीला लसीकरणासाठी केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या नियमांनुसार या प्रत्येक केंद्राने ३ ते ५ आदर्श लसीकरण स्थळं निर्देशित करावयाची आहेत. संबंधित रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालय) हे सुलभ आणि प्रभावी लसीकरणासाठी संघ नेमून त्याच्या समर्पित सदस्यांना निर्देश देतील.संबंधीत रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक हे मध्यवर्ती लससाठा शीतगृहातून कोविड - १९ लस उपलब्ध झाल्यानंतर ह्या लसीची लसीकरण यादी तयार करण्यासाठी संबधित कर्मचारी (औषध निर्माता / शीतसाखळी हाताळणी कर्मचारी) यांची निवड करतील. दरम्यान, लसीकरणासाठी विलेपार्लेतील डॉ. कूपर रुग्णालयात एक आदर्श लसीकरण केंद्र विकसित केले जात आहे, जेणेकरून इतर केंद्रांमध्ये त्याची प्रतिकृती तयार केली जाऊ शकेल. तसेच फ्रंटलाइन कामगारांसाठी दुस-या टप्प्यातील लस उपलब्धतेनुसार अतिरिक्त केंद्रे सुरू केली जातील.

७ जानेवारीपर्यंत प्रशिक्षण

दिनांक १४ आणि १५ डिसेंबर, २०२० रोजी प्रशिक्षकांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. सहाय्यक आरोग्य अधिकारी (विशेष लसीकरण कार्यक्रम) विभागातील चार वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डब्ल्यूएचओ- एसएमओ, यूएनडीपी-कार्यक्रम अधिकारी हे मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित आहेत. सोबत, वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, वरिष्ठ अधिकारी (दवाखाने) आणि सहाय्यक वैदयकीय अधिकारी (विलका) या सर्व प्रशिक्षकांचे आवश्यक प्रशिक्षण घेतले जात आहे. हे सर्व प्रशिक्षक आपापल्या केंद्रांवर आणि क्षेत्र पातळीवरील कर्मचा-यांना प्रशिक्षण देतील. हे प्रशिक्षण दिनांक ७ जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण केले जाईल.

प्रतिकूल घटनेसाठी समिती -

लसीकरणानंतर प्रतिकूल घटना उद्भवल्यास, सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, अशा घटनांच्या व्यवस्थापनासाठी उपनगरीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये येथे पुरेशी सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच अशा घटनांवर लक्ष ठेवणारी यंत्रणा मजबूत करण्यासाठी कार्डिओलॉजिस्ट, नेफरोलॉजिस्ट, श्वसन चिकित्सा विशेषज्ञ यांचा समावेश करण्यासाठी विद्यमान समितीचा विस्तार केला जाईल.

८० हजार सेवकांचा डेटा -

केंद्र सरकारकडून दिनांक ८ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स्) दिलेल्या सुचनेनुसार आरोग्य सेवक (हेल्थ केअर वर्कर्स) यांचा डेटा बेस कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केला जात आहे. आतापर्यंत सुमारे ८० हजार सेवकांचा डेटा कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे. एकूण १ लाख २६ हजार ३७८ सेवकांचा डेटा अपलोड करण्याची ही कार्यवाही देखील वेगाने सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, फ्रंटलाइन अभियंते, वाहन चालक, बेस्ट कर्मचारी, स्मशानभूमी कर्मचारी आणि देखभाल विभागातील कर्मचा-यांकडून आघाडीच्या कामगारांचा डेटा संकलित करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. फ्रंटलाईन वर्कर्सचा डेटा एकत्रित करून दिनांक २५ डिसेंबर, २०२० पर्यंत कोविन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी नगर विकास विभागाने निर्देशित केलेल्या समन्वय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.