ETV Bharat / state

मुंबई : आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करा कोरोना टेस्ट - COVID-19 test without prescription news

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी, बीएमसी शहरात कोणत्याही व्यक्तीला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय टेस्टिंग करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लॅब आता कोणाच्याही मर्जीवर आयसीएमआरच्या नियमावलीनुसार आरटी पीसीआर परिक्षण करणार आहे. दरम्यान, या निर्णयाने शंका असणाऱ्या लोकांना चाचणी करता येणार आहे. याची सुरूवात आजपासून केली जाणार आहे.

mumbai bmc declared No need for prescription for COVID-19 test
मुंबई : आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय करा कोरोना टेस्ट
author img

By

Published : Jul 8, 2020, 10:34 AM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईत वाढत असलेल्या या रुग्णांची संख्या पाहून बृहन्मुंबई महानगरपालिकेने टेस्टिंगच्या अनुषंगाने एक नवी गाईडलाइन जारी केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांनी याची ट्विट करुन माहिती दिली. यात त्यांनी, ज्या कोणाला कोरोना टेस्ट करावयाची आहे ते टेस्ट करु शकतात, टेस्टिंगसाठी आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसल्याचे म्हटलं आहे.

  • The @mybmc has decided to open up testing to any individual in the city without prescription/ self attestation. Labs can now conduct RT PCR tests as per ICMR guidelines at the will of anyone. This will help citizens feel safer and test when they have a doubt, without any delays.

    — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी, बीएमसी शहरात कोणत्याही व्यक्तीला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय टेस्टिंग करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. लॅब आता कोणाच्याही मर्जीवर आयसीएमआरच्या नियमावलीनुसार आरटी पीसीआर परिक्षण करणार आहे. दरम्यान, या निर्णयाने शंका असणाऱ्या लोकांना चाचणी करता येणार आहे. याची सुरूवात आजपासून केली जाणार आहे.

दरम्यान, याआधी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार, खासगी डॉक्टरांनाही एखाद्या रुग्णाला कोरोना चाचणीसाठी पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांवर भर देण्याचा केंद्राचा निर्णय खऱ्या अर्थाने लागू होण्यासाठी मदत होणार आहे. राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांसोबत झालेल्या एका बैठकीनंतर केंद्राने हा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी, केवळ सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरच कोरोना चाचणीची परवानगी मिळत होती. मात्र, आता खासगी डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरही कोरोनाची चाचणी करता येणार आहे. आयएमसीआरच्या नियमावलीनुसार एखाद्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसत असतील, तर खासगी डॉक्टरही त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देऊ शकतो.

हेही वाचा - पर्यटन कंपन्यांची मनमानी; रद्द झालेल्या परदेशवारीचे पैसे न देण्यासाठी नवी शक्कल

हेही वाचा - खूशखबर; राज्यात पोलिसांच्या 10 हजार जागा भरणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.