ETV Bharat / state

Best Workers Strike: बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच, ऐन दिवाळीत मुंबईकरांचे हाल

विविध मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून आंदोलन सुरु केले आहे. (Best workers strike). आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू असून ऐन दिवाळीत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

author img

By

Published : Oct 23, 2022, 3:48 PM IST

बेस्ट
बेस्ट

मुंबई: बेस्टकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर एसी बसेस चालवल्या जात आहेत. (best buses). मात्र असे असताना कंत्राटदारांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर दिला जात नाही आहे. जो पगार दिला जातो आहे तो ही कमी आहे. याविरोधात शनिवारपासून मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांताक्रुझ, धारावी, प्रतिक्षा नगर आणि मजास डेपो येथे आंदोलन सुरु केले आहे. (Best workers strike). आज दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू असून ऐन दिवाळीत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन: बेस्ट कडून कंत्राटी पद्धतीने एसी बसेस चालवल्या जात आहेत. या बसेस वर नियुक्त केलेल्या कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराकडून समान वेतन आणि अन्य आवश्यक कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. १७ हजार पगार देण्याचे सांगून केवळ १२ हजार पगार दिला जात आहे. वाहतुकीचे कंत्राट अन्य संस्थांना दिले तरी सध्याच्या कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित केले जावे, बेस्टमधील कंत्राटी कामगारांना कामयस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस दिला जावा, अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, पगारवाढ, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांसाठी शनिवारी सांताक्रुझ डेपो येथे मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यात सांताक्रुझ, धारावी, प्रतिक्षा नगर, मजास डेपो मधील सुमारे हजारहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलकांना शनिवारी संध्याकाळ पर्यंत पगार दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अजूनही पगार झाला नसल्याने आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर

ऐन दिवाळीत त्रास: मुंबईत सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळी सणाच्या खरेदीसाठी आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठी बेस्ट बसचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रविवारी दीपावली निमित्त मुंबईकरांसाठी अधिकच्या ३६३ बसेस सोडण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते, मात्र बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक बसेस डेपोमध्ये उभ्या होत्या. यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.