ETV Bharat / state

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनात पुन्हा दीड हजाराची चिल्लर

बेस्ट बस कर्मचाऱ्यांना वेतनात चिल्लर दिली जात आहे. तर बेस्ट उपक्रमावर आतापर्यंत कामगारांना सुट्टे पैसे देण्याची वेळ अनेकवेळा आली आहे.

best bus
बेस्ट बस
author img

By

Published : Sep 15, 2020, 10:47 PM IST

मुंबई - बेस्ट उपक्रमाचे तिकीट दर कमी केल्यापासून सुट्ट्या पैशांची समस्या निर्माण झाली आहे. बेस्टकडे सुट्ट्या पैशांची नाणी मोठ्या प्रमाणात जमा झाली आहेत. ही नाणी कर्मचाऱ्यांना पगारातुन दिली जात आहेत. ऑगस्ट महिन्याच्या वेतनात कर्मचाऱ्यांना नेहमीप्रमाणे दीड हजार रुपयांची चिल्लर देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे. निविदा प्रक्रिया रखडल्याने चिल्लर पगारातून दिली जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

बेस्टचे तिकीट दर ५, १०, १५, २० असे आहेत. त्यामुळे बेस्टकडे ५-१० ची पुष्कळ नाणी जमा होतात. ती संपवायची कशी? असा प्रश्न बेस्ट प्रशासनापुढे असतो. त्यामुळे बेस्ट प्रशासन तोट्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमा झालेली नाणी बेस्ट कामगारांच्या माथी मारण्याचा हा प्रकार असल्याचे एका बेस्टच्या उच्च स्तरीय कर्मचाऱ्याने सांगितले. सुट्ट्या पैशांच्या निपटाऱ्यासाठी आवश्यक असणारी निविदा प्रक्रिया रखडल्याने उपक्रमावर ही वेळ आल्याचे सांगण्यात येत आहे. बेस्ट उपक्रमाने यापूर्वी भाडेकपात करत ५, १० रुपयाच्या टप्प्यात तिकीट दर जाहीर केले. तेव्हापासून सुट्ट्या पैशांचे डोंगर उपक्रमाकडे उभे राहत आहेत.

लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर ५, १० रुपयांची नाणी प्रचंड स्वरुपात जमा होत आहे. बँकांकडून ही नाणी स्वीकारली जात नसल्याने सुट्ट्या पैशांची रक्कम वाढत गेली आहे. त्यामुळे निविदा मागवून त्याची पूर्तता केली जाते. कोरोना काळात ही प्रक्रिया लांबल्याने बँकांकडून सुट्टे पैसे स्वीकारण्यात येत नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बेस्टने सुट्टे पैशांच्या व्यवस्थेसाठी कामगारांना त्यांच्या वेतनात रोख स्वरुपात दिले जाते आहे. बेस्ट उपक्रमावर आतापर्यंत कामगारांना सुट्टे पैसे देण्याची वेळ अनेकवेळा आली आहे.

उपक्रमाकडून ऑगस्टच्या पगारातून १२ हजार रुपये १०, २०, ५० रुपयांच्या नोटा आणि दीड हजार रुपये नाण्याच्या स्वरुपात देण्यात आले. त्यातील दीड हजारांची चिल्लर प्लास्टिक पिशव्यामधून देण्यात आली. पगाराची रक्कम घेताना सुट्टे पैसे मोजून घेण्याची कसरत कर्मचाऱ्यांना करावी लागली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.