ETV Bharat / state

Rising Sea Levels : धोक्याची घंटी! मुंबईसह अनेक देशांची समुद्राची पातळी वाढली, वाचा सविस्तर - हवामान

जागतिक हवामान विज्ञान संघटनेने मुंबईसह अनेक देशांची समुद्राची पातळी वाढली असल्याचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातील शहरांना या हवामान बदलामुळे होणाऱ्या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसू शकतो, अशी धोक्याची सूचना या अहवालातून देण्यात आली आहे.

Rising Sea Levels
समुद्राची पातळी वाढली
author img

By

Published : Feb 15, 2023, 10:50 PM IST

मुंबई : मुंबईत फेब्रुवारी महिन्यात दिवसा उष्ण तापमान आणि रात्री थंडी असे विचित्र वातावरण असून प्रदूषणाचा देखील स्थर वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे देखील दिसून येत आहे. त्यातात जागतिक हवामान विज्ञान संघटनेने (WMO) आपल्या नव्या जागतिक अहवालात जागतिक महासागर पूर्वीपेक्षा अधिक वेगाने गरम होत आहेत, त्यामुळे भारतासारखे अनेक देश असुरक्षित असल्याची चेतावणी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबईसह मोठ्या किनारपट्टीवरील शहरांची यादी या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालातील शहरांना या हवामान बदलामुळे होणाऱ्या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसू शकतो, अशी धोक्याची सूचना या अहवालातून देण्यात आली आहे.

कोणत्या शहरांना धोका ? : अहवालानुसार भारत, चीन, बांगलादेश तसेच नेदरलॅण्डला जागतिक स्तरावर समुद्रातील पाणी पातळी वाढीचा सर्वाधिक धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या देशांना समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यास सर्वात मोठा फटका बसू शक, तो असे या अहवालात नमूद केले आहे. जागतिक हवामान विज्ञान संघटनेने जारी केलेल्या अहवालाचं नाव 'ग्लोबल सी-लेवल राइज अ‍ॅण्ड इम्प्लीकेशन्स' असे आहे. वेगवेगळ्या खंडांमधील अनेक मोठी शहर समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने ही शहरे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शांघाय, ढाका, बँकॉक, जकार्ता, मुंबई, मापुटो, लागोस, काहिरा, लंडन, कोपेनहेगन, न्यूयॉर्क, लॉस एन्जलीस, ब्यूनस आयर्स आणि सँटियागो सारख्या शहरांचा समावेश आहे. हवामानातील या बदलामुळे दुष्काळ, पूर आणि उष्णता अधिक गंभीर स्वरुप धारण करेल, त्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ झाल्याने खाद्य सुरक्षेसाठीचा धोका वाढेल,' असे अहवालात सांगण्यात आले आहे.

भारतावर दीर्घकाळ परिणाम : अहवालातील आकडेवारीनुसार, 1901 ते 1971 दरम्यान समुद्र पातळी वाढीचा सरासरी दर वर्ष-1 1.3 मिमी होता, 1971 आणि 2006 दरम्यान 1.9 मिमी/ प्रति वर्ष आणि 2006 आणि 2018 दरम्यान 3.7 मिमी/ प्रति वर्ष वाढला. WMO ने अहवाल दिला आहे की, 2013-22 या कालावधीत समुद्राच्या पातळीत दरवर्षी 4.5 मिमी वाढ झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वोच्च आहे. तसेच आणखी मोठे आव्हान आहे की, समुद्र पातळीतील ही वाढ जागतिक पातळीवर एकसारखी नाही आणि प्रादेशिक पातळीवर बदलते आहे. 7,500 किमीचा समुद्रकिनारा नऊ किनारी राज्यांमध्ये पसरलेला आहे. 12 मोठी आणि 200 लहान बंदरे आहेत. भारताला दीर्घकालीन गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. या अहवालाने भारतावर टांगती असलेली धोक्याची तलवार आणि असुरक्षितता पुन्हा एकदा उघड केली आहे. भारती इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक पॉलिसीचे संशोधन संचालक आणि IPCC अहवालाचे प्रमुख लेखक अंजल प्रकाश यांनी सांगितले की, खारटपणा आणि मत्स्य उत्पादनात घट झाल्यामुळे समुद्राची पातळी वाढल्याने भारतालाही पाण्याच्या असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे.

बदल करणे आवश्यक : प्रकाश यांच्या म्हणण्यानुसार, मच्छिमारांचे जीवनमान सुरक्षित करण्यासाठी आणि किनारी भागात राहणाऱ्यांना सुरक्षित आणि शुद्ध पाणी पुरवण्याच्या दृष्टीने जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणखी बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला धोरण निश्चित कारण्यासाठी त्या स्तरावर अधिक चर्चेची गरज आहे, केवळ अनुकूलन बद्दलच नाही तर स्थानिक पातळीवर हवामानाच्या प्रभावांचे मॅपिंग करण्याबद्दल देखील, असे प्रकाश हे म्हणाले.

हेही वाचा : Grandmother Donate Kidney : आजी ठरली देवदूत; 73 वर्षाच्या आजीने 21 वर्षीय नातवाला किडनी दान करुन दिले जीवनदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.