ETV Bharat / state

विमानाच्या शौचालयात, कपड्यात लपवले अडीच किलो सोने, कस्टम विभागाच्या झाडाझडतीत पोलखोल

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबईच्या उत्पादन ( Mumbai Airport Customs ) सीमा विभागाने मोठी कारवाई केली आहे. दोन प्रकरणांमध्ये एकूण 2.5 कोटी रुपयांचे ( seized a total of 4712 grams of gold ) एकूण 4712 ग्रॅम सोने जप्त केले ( gold worth Rs two crore fifty lakhs ) आहे

Mumbai Airport Custom
मुंबई सीमा शुल्क विभाग कारवाई
author img

By

Published : Dec 5, 2022, 6:53 AM IST

Updated : Dec 5, 2022, 9:28 AM IST

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबईच्या उत्पादन ( Mumbai Airport Customs ) सीमा विभागाने मोठी कारवाई केली आहे. दोन प्रकरणांमध्ये एकूण 2.5 कोटी रुपयांचे ( seized a total of 4712 grams of gold ) एकूण 4712 ग्रॅम सोने जप्त केले ( gold worth Rs two crore fifty lakhs ) आहे. मुंबई विमानतळावर सुमारे अडीच कोटींचे सोने कस्टम विभागाने हस्तगत केले. कपड्यात, विमानाच्या शौचालयात हे सोने लपवण्यात आले होते. कस्टम विभागाने केलेल्या झाडाझडतीत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या कारवाईमध्ये एअर इंटेलिजन्स युनिटने १.१७ कोटी रुपयांचे अडीच किलो सोने जप्त केले होते. दक्षिण मुंबईतील रहिवाशी आरोपीला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आज पहाटे, मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या झाडाझडतीत सुमारे अडीच कोटी रुपयांचे जप्त करण्यात आले. कपड्याखाली, विमानाच्या टॉयलेटमध्ये सोन लपवल्याचे या कारवाईत उघड झाले आहे. तीन जणांना विभागाने ताब्यात घेतले आहे.

  • Maharashtra | Mumbai Airport Customs seized a total of 4712 grams of gold worth Rs 2.5 cr in two cases and arrested 3 accused. Further investigation is underway pic.twitter.com/UkmC2yZFC1

    — ANI (@ANI) December 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
कस्टम विभागाने एकूण ४,७१२ ग्रॅम सोने जप्त केले आहे. दोन प्रकरणात हे सोने जप्त केले आहेत. यातले १,८७२ ग्रॅम सोने हे कपड्याखाली तर २.८४० ग्रॅम सोने विमानाच्या शौचालयात लपवून ठेवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईत सोने तस्करीचे प्रकार वाढत असल्याने कस्टम विभाग सतर्क झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या तपासणीत मागील वर्षभरापासून आजवर हजारो कोटींच्या सोने हस्तगत केल्याचे पालिसांनी स्पष्ट केले

दिल्ली मुख्यालयातून सीमा शुल्क विभागाच्या प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवरून मुंबई सीमाशुल्क पथकाने कारवाई करत परदेशातून मुंबईत पोहोचलेल्या विमानाची झडती घेतली. यादरम्यान, फ्लाइटच्या टॉयलेटमध्ये 2,840 ग्रॅम सोने लपविल्याचे आढळून आले. ते सोने सीमाशुल्क पथकाने जप्त केले.

अंडरगारमेंटमध्ये लपविलेले सोने जप्त अन्य एका प्रकरणात, संशयाच्या आधारावर प्रवाशांची झडती घेतली असता कस्टम पथकाने 1,872 ग्रॅम सोने जप्त केले. तीन प्रवाशांनी परिधान केलेल्या खास डिझाइन केलेल्या अंडरगारमेंटमध्ये हे सोने लपवण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे एकूण वजन ४,७१२ ग्रॅम आहे. त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे.तस्करीच्या आरोपाखाली तीन विमान प्रवाशांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. हे सोने कोठून आणले याबाबत आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी मुंबई विमानतळावरच सुमारे 32 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते. त्यामध्ये 2 महिलांसह एकूण 7 जणांना अटक करण्यात आली होती. जप्त केलेल्या सोन्याचे वजन 61 किलो होते.

Last Updated : Dec 5, 2022, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.