मुंबई : रोज नवीन अपघाताच्या घटना ऐकायला मिळत आहे, दिवसेंदिवस प्रमाण वाढत चालले आहे. असाच एक नवीन अपघात समोर आला आहे. मुंबईतल्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठा अपघात झाला आहे. चुनाभट्टी जवळ सिमेंट मिक्सर ट्रकने चार वाहनांना दिली. या अपघातात एकाचा मृत्यूमुखी पडला आहे. तीनजण गंभीररित्या जखमी झालेले आहेत. जखमींना जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघात स्थळावरून सिमेंट मिक्सर चालक फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सिमेंट मिक्सर ट्रकने 2 ऍक्टिव्हा, एक मोटार सायकल आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या एक व्हॅनला धडक दिली आहे.
ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने अपघात : या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सायन रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. अपघातांनंतर सिमेंट मिक्सर चालक घटनास्थळहून फरार झाला आहे. चुनाभट्टी पोलीस याचा तपास करत आहे. पावसाळ्यात रस्ता निसरडा झाल्याने हा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज आहे. त्याचप्रमाणे सिमेंट मिक्सर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला आहे.
दुचाकी वाहनांचा चक्काचूर : घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस पोहोचले आहेत. त्यांनी तात्काळ जखमींना सायन रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात सिमेंट मिक्सर ट्रकच्या जोरदार धडकेने दुचाकी वाहनांचा चक्काचूर झालेला आहे. या अपघाताचा चुनावर्ती पोलीस अधिक तपास करत आहे. अपघात झाल्यामुळे वाहनांची गर्दी झाली होती. रस्त्यावर वाहतुक देखील खोळंबली होती. नागरिकांनी देखील गर्दी केली होती. वाहन चालक हा फरार झालेला आहे.
हेही वाचा :
- Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे धक्कादायक कारण, फॉरेन्सिक अहवालातून समोर आली माहिती
- Mumbai Agra Highway Accident: महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर भीषण अपघात; कंटेनरची वाहनांना धडक, दहा ठार
- Buldhana Bus Accident: अपघातातील २४ मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार, एक मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला, स्मशानभूमिला छावणीचे स्वरुप