ETV Bharat / state

Mumbai News: समाज माध्यमांमध्ये फोटो प्रसारित केल्याने दुचाकीस्वार दोषी ठरत नाही- मुंबई न्यायालयाचे निरीक्षण

सायकल चालवणाऱ्या व्यक्तीने चुकीच्या रीतीने दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीचा फोटो समाज माध्यमात प्रसारित केला होता.पोलिसांकडे तक्रार केली. तो फोटो ट्विटरवर टॅग केला म्हणून दुचाकी वाहन चालकाला दोषी मानता येत नाही. सबब त्या दुचाकी वाहन चालकाला महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष म्हणून सोडले.

Mumbai A two wheeler driver cannot be held guilty
दुचाकी वाहनचालकाला दोषी मानता येत नाही
author img

By

Published : Mar 6, 2023, 11:04 AM IST

मुंबई : मुंबईमध्ये एक अनोखी घटना घडलेली आहे. ताडदेव राहणाऱ्या 21 वर्षीय व्यक्तीने दुचाकी वाहन चालवले. हे वाहन चालताना त्याने निष्काळजीपणा केला. त्याने कायद्याचा भंग केला म्हणून एका सायकल चालवणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलीसांच्या ट्विटर हँडलवर पोलिसांना ती तक्रार टॅग केली. मात्र महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने त्या दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली.

चुकीच्या दिशेने वाहन चालवले: तक्रार करणाऱ्या व्यक्तीने तो सायकल चालवत असताना त्याला दुचाकी वाहन चालवणारा व्यक्ती दिसली. तो दुचाकी वाहन चालवणारा व्यक्ती चुकीच्या दिशेने वाहन चालवत होता. त्यामुळे कोणाचा अपघात झाला असता किंवा कोणाला दुखापत होऊ शकली असती. त्यामुळे जवळ जाऊन त्या व्यक्तीला विचारणा केली. तू चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत आहे असे म्हणून त्याचे ते फोटो काढले. त्यानंतर ते मुंबई पोलीसांना टॅग करून या व्यक्तीने चुकीच्या दिशेने वाहन चालवले अशी तक्रार केली. मात्र एवढ्या वस्तुस्थितीचे ते फोटो त्याआधारे तो वाहन चालक व्यक्ती दोषी आहे, असे सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने त्या संदर्भातील सुनावणी करताना म्हटले आहे.

पोलीसांना फोटो पाठवला: मुंबई शहरामध्ये मुंबई पोलिसांनी दुचाकी वाहन बेकायदेशीरपणे चालवणाऱ्या बाबत अनेकदा जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे अनेकदा नागरिक बेकायदा वाहन चालवणाऱ्यांच्या बाबत समाज माध्यमातून त्याचा फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करतात. असेच या प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर एक वाहन चालक चुकीच्या बाजूने आपले वाहन चालवित होता. याबाबतचा फोटो सायकल चालवणाऱ्या व्यक्तीने काढला. पोलीसांना ट्विटरवरून पाठवला. मात्र महानगर दंडाधिकारी यांनी समाज माध्यमातील इलेक्ट्रॉनिक छायाचित्र पुरावा म्हणून ग्राह्य मानत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने कायद्याचे उल्लंघन केलेले आहे हे सिद्ध होत नाही, असे म्हणत त्याला निर्दोष सोडले.

नियमाचा भंग: महानगर दंडाधिकारी यांनी हे देखील नमूद केले की, असे फोटो काढून तेवढ्याने तो व्यक्ती नियमाचा भंग करतो त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होते. हे कसे काय सिद्ध होऊ शकते? त्यामुळे एखादी व्यक्ती दोषी आहे. त्यासाठी केवळ एखादा फोटो किंवा काही फोटो हेच प्रमाणभूत मानता येत नाही. कारण त्या ठिकाणचे नेमके वर्णन आणि त्याचा पत्ता आणि ते लोकेशन तक्रारदाराला सिद्ध करता आले नाही. त्यामुळे या घटनेत तरी सायकल स्वार अर्थात तक्रारदाराला दुचाकी वाहन चालकाने नियमाचा भंग केला आहे हे काही सिद्ध करता आलेले नाही.

हेही वाचा: Mumbai Crime News 66 लाखांच्या ईसिगारेट मस्जिद बंदर परिसरातून जप्त गुन्हे शाखेची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.