ठाणे - कळवा पुर्व भागातील गोलाई नगर परिसरातील घरांवर दरड कोसळल्याच्या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५ जणांना ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये १ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. महापालिका आपत्ती व्यवस्थापन, TDRF आणि NDRF, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आङे. ढिगाऱ्याखाली अजून लोकं अडकली असल्याची शक्यता असून शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
Rain LIVE : पावसामुळे मेल, एक्स्प्रेस सेवा विस्कळीत; कळव्यात घरांवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू - heavy rains in Ratnagiri
19:05 July 19
कळव्यात घरांवर दरड कोसळली; 5 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
19:04 July 19
भिवंडी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद
ठाणे - जिल्ह्यात 24 तासात बरसलेल्या मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद भिवंडी तालुक्यात झाली आहे. गेल्या 24 तासात एकट्या भिवंडी तालुक्यात सुमारे 180 मि.लि तर सर्वात कमी मुरबाड तालुक्यात झाली आहे.
17:17 July 19
पावसामुळे मेल, एक्स्प्रेस सेवा विस्कळीत
मुंबई - करमळी आणि थिवी दरम्यान जोरदार पाऊस पडल्याने कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. रेल्वे रूळावर चिखल जमा झाल्याने अनेक मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. 19 जुलै रोजीची गाडी क्रमांक 01112 मडगाव-सीएसएमटी कोकणकन्या विशेष गाडी आणि गाडी 20 जुलै रोजीची गाडी क्रमांक 01113 सीएसएमटी-मडगाव मांडवी विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे.
13:52 July 19
ठाणे: अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यालयात शिरले पाणी
ठाणे - अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यालयात पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे नगरपालिका प्रशासनाने सर्वच विभागाचे कामकाज बंद करण्यात आले आहे.
13:34 July 19
ठाण्यात वाहतूक व्यवस्था कोलमडली
ठाणे - भिवंडी शहरातील निजामपुरा, कनेरी, कमला होटेल , नारपोली, पद्मा नगर, तीन बत्ती, शिवाजी नगर, भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागात शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे हाल झाले आहे. दरम्यान, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजूर फाटा, वंजारपट्टी नाका, नारपोली अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
13:33 July 19
भिवंडीतील बहुतांश सखल भाग जलमय
ठाणे - मुसळधार पावसाने एकीकडे जिल्ह्यात हाहाकार उडाला असतानाच भिवंडी शहर व ग्रामीण भागातही पावसाने धुमाकूळ घातल्याने भिवंडी शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली जाऊन जलमय झाला आहे. तर बहुतांश सखल भागातील दुकांनासह रस्त्यावर पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाल्याचे पाहवयास मिळत आहे.
13:31 July 19
अर्जुना नदीत एकजण गेला वाहून, शोधकार्य सुरू
रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीत एकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. रायपाटण गांगणवाडी येथे ही दुर्घटना घडली. विजय शंकर पाटणे (७० रा. खेड) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. ते रायपाटण गांगणवाडी येथे नातेवाईकांकडे आले होते. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ते अर्जुना नदीकिनारी गेले असता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी दिली. दरम्यान पाटणे यांचा शोध सध्या सुरू आहे.
13:29 July 19
मासुंदा तलाव ओव्हर फ्लो; मासे रस्त्यावर
ठाणे - गेले दोन दिवस ठाण्यात कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले असून नागरिक धास्तावले आहेत. परंतु मासुंदा तलाव भरून वाहू लागल्याने काही मासे खाणारे खवय्ये मात्र खुश झाले आहेत. मासुंदा तलाव भरल्याने त्यातील पाणी चक्क शेजारील भाजी मार्केट मध्ये घुसले. काही वेळाने तेथील व्यापाऱ्यांना पाण्यातून आलेले मोठाले मासे दिसताक एकच गलका उडाला व सर्वजण हे मासे पकडण्यासाठी धावपळ करू लागले होते. हातात पिशव्या घेऊन अनेकजण हे मासे त्यात भरताना दिसत आहेत.
13:29 July 19
ठाणे: ईद साठी आणलेल्या 15 बकऱ्यांचा बुडून मृत्यू
ठाणे - गेले दोन दिवस सतत पडत असलेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी भरत असून याचा फटका सामान्यांना बसत आहे. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. यातच मुंब्र्यातील एका दुर्दैवी घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उद्यावर आलेल्या ईदसाठी मोहमद फहाद या व्यापाऱ्याने एकूण 29 बकरे विक्रीसाठी आणले होते. एका गोदामात हे बकरे ठेवले होते व त्यांच्या घाऊक विक्रीचा सौदा देखील काल उशिरा ठरला होता. आज सकाळी ग्राहक येऊन ते बकरे न्यायचे ठरले होते परंतु पावसाने त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. काल रात्री उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे बकरे असलेल्या गोदामात अचानक पाणी शिरले आणि त्यातच एकूण 15 बकऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. 14 बकऱ्यांना वाचविण्यात यश आले खरे परंतु मेलेल्या बकऱ्यांमुळे सदर व्यापाऱ्यांचे जवळपास तीन ते चार लाखांचे नुकसान झाल्याची माहिती मोहम्मद फहाद या व्यापाऱ्याने दिली आहे.
13:22 July 19
कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे इतर मार्गाने
कोकण मार्गावरील थिविम आणि करमाली दरम्यान डोंगरावरील माती वाहून आल्याने रेल्वेमार्गावर चिखल झाला आहे. रेल्वेमार्गावरील चिखल बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या दरम्यान या मार्गावरील पनवेल, कर्जत, पुणे, मिरज, हुबळी, कृष्णराजापुरम, एरोडे, शोरनुर या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
13:20 July 19
पावसामुळे लोकल सेवा संथ गतीने
मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅंटिग केल्याने रेल्वे सेवा कोलमडून पडली आहे. संपूर्ण रविवारी दिवस लोकलचा चालू-बंद खेळ सुरू होता. त्यामुळे सकाळी बाहेर पडलेल्या नागरिकांना घरी जाण्याची ओढ लागली होती. तर आज सोमवारी, (ता.19) रोजी सकाळी 11 च्या सुमारास विक्रोळी-कांजूरमार्ग लोकल सेवा बंद केल्या होत्या. त्यानंतर 15-20 मिनिटांनी विक्रोळी-कांजूरमार्ग लोकल सेवा सुरू करण्यात आली. तर, इतर मार्ग संथ गतीने सुरू होते. लोकल चालू-बंदचा खेळ सुरू असल्याने सीएसएमटी येथे लोकल बँचिग झाली होती. मध्य व हार्बर दोन्ही मार्गावर लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहे.
12:52 July 19
आंबा घाटात दरड कोसळली
रत्नागिरी - कोकणात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ही दरड हटवण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्याकरता आणखी काही कालावधी जाण्याची शक्यता आहे. सध्या ही दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
12:51 July 19
मुंबई पूर्व उपनगर परिसरात 40.57 मिलिमीटर नोंद
मुंबई - परिसरात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 4 तासांत मुंबई शहर परिसरात 6.29 मिलिमीटर, पूर्व उपनगर परिसरात 40.57 मिलिमीटर आणि पश्चिम उपनगर परिसरात 24.44 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
12:34 July 19
ठाण्याला पावसाने झोडपले, अनेक महामार्ग पाण्याखाली
ठाणे - शहरात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. ठाण्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर मासूंदा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. ठाणे मनपा मुख्यलयाबाहेर गुडघाभर पाणी साचले आहे. हाजूरी, राम मारुती रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट, नौपाडा, जांभळी नाका, पिसे, मानपाडातील काही भाग आणि ठाणे पश्चिम बाजारपेठ पाण्याखाली गेला आहे. ठाणे शहराला लागून असलेला शिळ डायघर महामार्ग आजही पाण्याखाली गेला आहे. दिवा शिळ चौक येथील मुंब्रा खान कम्पाउंड महामार्ग पुर्ण पाण्याखाली गेला आहे. मुंब्रा शहरात रहिवाशी भागात पाणी साचण्याचे प्रमाण वाढू लागले. दरम्यान रस्त्यावर नागरिकांना मासे ही सापडले आहे.
12:25 July 19
रायगड : दिघी माणगाव रस्त्यावर दरड कोसळली, जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
रायगड - जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिघी माणगाव रस्त्यावर दरड कोसळली आहे. तर जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे.
12:22 July 19
गोव्यातील करमळी बोगद्यात माती कोसळली, वाहतूक ठप्प
मुंबई - कोकण रेल्वे मार्गावर गोव्यातील करमळी बोगद्यात माती कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. हा मार्ग पूर्ववत व्हायला किमान 10 तास लागतील अशी माहिती मिळाली आहे. या मार्गावरील सर्व गाड्या ह्या दुसऱ्या महामार्गावर वळवल्या असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
11:27 July 19
कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली
नाशिक - जिल्ह्यातील कसारा घाटातील जव्हार फाट्या जवळ नाशिक-मुंबई रेल्वे मार्गावर पहाटे 5 वाजता बाजूला असलेल्या डोंगरावरून दरड व माती कोसळण्याची घटना घडली, यात रेल्वे ट्रक वर मोठया प्रमाणात मातीचा ढिगारा तयार झाला होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वेची आपत्कालीन सहायता टीम, आरपीएफ, व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.
10:42 July 19
ठाणे ते सीएसएमटी दरम्यान लोकल ठप्प
मुंबई - ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची लोकल ठप्प आहे. अनेक रेल्वे स्थानकावरील पाण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे लोकल सेवा ही ठप्प झाली आहे. दरम्यान मध्य रेल्वे वाहतूक ही विसकळीत झाली असून अनेक रेल्वे रुळ हे पाण्याखाली गेले आहेत.
10:03 July 19
कोकणात पाच दिवस रेड, ऑरेंज अलर्ट
मुंबई - कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी रेड अॅलर्ट आणि ऑरेंज अॅलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचे प्रशासन हे अलर्ट झाले आहे. तर राज्याच्या इतर भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
10:03 July 19
राज्यातील जिल्ह्यात रेड अलर्ट
मुंबई - सोमवारी पहाटे पासूनच राज्यात कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात रिपरिप पावसाने सुरुवात केली आहे. आज रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, सातारा, पुणे आणि कोल्हापूरला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
09:00 July 19
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला अलर्ट राहण्याचे निर्देश
मुंबई - शहरात पुढच्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. हवामान खात्याने मुंबईसह कोकणाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळपासूनच मुंबई उपनगरांत पावसाचा जोर कायम असून रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा सध्या सुरळीत आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहे.
22:28 July 18
मुंबईचा पाणीपुरवठा सुरू.. भांडुप जलशुुद्धीकरण यंत्रणा पूर्वपदावर, मुंबईकरांना BMC चे 'हे' आवाहन
मुंबई - भांडुप जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज पाणीपुरवठा बाधित झाला. संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
21:46 July 18
पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी - मुख्यमंत्री
मुंबई - पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अनपेक्षितरित्या कोणतीही दुर्घटना होणार नाही, यासाठी सतर्क राहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरडग्रस्त भाग, मोडकळीस आलेल्या इमारतींकडे लक्ष ठेवा. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसाठी उपाययोजना करा, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईच्या पालकमंत्र्यांसमवेत आपत्तीचा आढावा घेतला.
21:05 July 18
मुंबईत भिंती कोसळण्याच्या तीन घटनेत एकूण ३० जणांचा मृत्यू
मुंबई - मुंबईत भिंती कोसळण्याच्या तीन घटनेत एकूण ३० जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमधील वाशी नाका येथे दरड कोसळून १९ लोकांचा मृत्यू तर ५ जण जखमी झाले आहेत. विक्रोळी सुर्यानगर येथे १० मृत्यू १ जखमी. मुलुंड येथे १ असे एकूण ३० मृत्यू झाले आहेत.
19:52 July 18
येत्या 24 तासांत अतिवृष्टीच इशारा, मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट जारी
मुंबई - येत्या 24 ते 36 तासात कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचसोबत नैऋत्य वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्याचं बघायला मिळत आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.
18:46 July 18
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक, मुंबईतील आपत्तीचा घेणार आढावा
मुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबईत उद्भवलेल्या आपत्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक होणार आहे. बैठकीत पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावासाच्या हाहाकारामुळे विविध ठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
17:36 July 18
विक्रोळी दुर्घटनेतील मृतांची नावे जाहीर
मुंबई - विक्रोळी भागात इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागातही एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते
17:35 July 18
मुंबई महापालिकेकडून चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांची नावे जाहीर
मुंबई - मुंबईमध्ये पावसाने कहर केला असून चेंबूरमध्ये काही घरांवर दरड कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत विक्रोळीमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांची ओळख पटली असून पालिकेने या मृतांची नावे जाहीर केली आहेत. विक्रोळी भागात इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागातही एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते
17:19 July 18
चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेला मुंबई महापालिका जबाबदार, प्रवीण दरेकरांचा आरोप
मुंबई - विक्रोळी सुर्यनगर येथे एका घरावर दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हे पावसाचे नव्हे, तर महानगरपालिकेच्या निष्क्रियपणाचे बळी आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. 'हे पूर्णपणे महानगरपालिकेच्या निष्क्रियपणाचे बळी आहेत. मुंबईत पाऊस दरवर्षी पडतो. दरवर्षी मुंबईही तुंबते. अशावेळी तुंबणारी ठिकाणे कोणती व कोणत्या भागात दरडी आहेत, याचा डाटा पालिकेकडे असतो. केवळ नोटीस चिटकवली म्हणजे जबाबदारी संपली का? जर त्यांनी त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न सोडवला असता तर ते स्थलांतर झाले असते. आता नागरिक मृत्युमुखी पडल्यानंतर आम्ही नोटिसा दिल्या होत्या म्हणजे यांची जबाबदारी संपली का. पावसावर जबाबदारी ढकलली, असे होत नाही. तुम्हाला जबाबदारीपासून पळता येणार नाही. या सर्व झालेल्या घटनेला महानगरपालिका जबाबदार आहे आणि त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारावी. पाच-दहा लाख रुपये देऊन लोकांचे जीव तर परत येणार नाहीत ना. यामुळे संभाव्य दुर्घटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे', असे दरेकरांनी म्हटले आहे.
16:46 July 18
चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
15:41 July 18
चेंबूर दुर्घटना : दरड कोसळल्याने छत गेले व उपजीविकेचे साधनही.. जगायचं कसं ?
मुंबई - मुंबईतल्या चेंबूर मधल्या भारत नगर परिसरात कालची रात्र काळरात्र ठरली. कोसळणाऱ्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं. कोसळणार्या पावसामुळे चेंबूर परिसरात भारत नगरला लागून असलेल्या डोंगरावरुन रात्री दरड कोसळली. यात अनेक घरांची पडझड झाली. यामध्ये पंधरापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. काहींच्या घरात सर्व संसारोपयोगी सामान पाण्यात वाहून गेले. याच परिसरातील एका पीडितेच्या घरावर दरड कोसळल्याने त्यांच्या उपजिवीकेचे साधन असलेले शिलाई मशीन ढिगाऱ्याखाली गेले. लॉकडाऊनमुळे पतीच्या हाताला काम नाही. शिलाई मशीनद्वारे पोट भरायचं. आता शिलाई मशीन नाही त्यात डोक्यावर छत नाही त्यामुळे जगावं कसं हा प्रश्न पीडिते समोर उभा ठाकला आहे
15:26 July 18
Mumbai Rains : दहिसर, चेंबूर, विक्रोळी, कांदिवली, मरोळ, बोरिवली, वरळीत सर्वाधिक पावसाची नोंद
मुंबई - मुंबईत काल रात्री ११ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे ४ वाजेपर्यंत पाऊस पडत होता. यादरम्यान दहिसर, चेंबूर, विक्रोळी, कांदिवली, मरोळ, बोरिवली, वरळी आणि फोर्ट परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच महापालिका मुख्यालयावर असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये तब्बल २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
14:57 July 18
आदित्य ठाकरे यांच्याकडून सूर्य नगरची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
मुंबई - शनिवारी 200 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला दोन वर्षापूर्वी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधली गेली होती. त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी कमी झाली. मृतांच्या नातेवाईकांना सीएम रिलीफ फंड आणि डिझास्टर मॅनेजमेंट कडून पाच लाखांची मदत दिली जाणार आहे. यासोबत जखमींच्या उपचारांचा खर्च देखील उचलला जाईल, अशी माहिती पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांनी आज विक्रोळी सुर्यनगर येथील दुर्घटनेची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.
14:01 July 18
महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची चेंबूर घटना स्थळाला भेट
मुंबई - महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी चेंबूर घटना स्थळाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की या घटनेमध्ये बाधित झालेल्या लोकांना योग्य ठिकाणी हालवण्याचे काम सुरू आहे. त्यांना महापालिकेकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल. असे ते म्हणाले.
13:35 July 18
आदित्य ठाकरे यांची चेंबूर घटनास्थळाला भेट
पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूर येथील घटनास्थळाला भेट दिली आहे.
13:33 July 18
Video : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची चेंबूर घटनास्थळाला भेट
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची चेंबूर घटनास्थळाला भेट दिली आहे.
13:01 July 18
राष्ट्रपतींनी केले दु:ख व्यक्त
मुंबई येथे झालेल्या मुसळधार पावसाने दरड कोसळण्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी अंत्यत वेदनादायी असून मी त्यांच्या आप्तजनांच्या दुःखात सहभागी आहे. असे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे.
13:01 July 18
विक्रोळी दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
मुंबई - शहरात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारची रात्र ही मुंबईसाठी काळरात्र ठरली आहे. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील विविध भागात दुर्घटना घडल्या आहेत. विक्रोळी सूर्यानगर येथे एका घरावर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून मदत कार्य सुरू आहे. याबाबतचा आढावा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी घेतला आहे.
12:51 July 18
पावसाळ्यापूर्वी दिल्या होत्या नोटीस - बीएमसी
मुंबई - विक्रोळी सुर्यनगर येथील दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखविली आहेत. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ती जिल्हाधिकारी लँड होती आणि या परिसरातील संरक्षक भिंती या तात्काळ दुरुस्त कराव्यात या संदर्भातला पत्रव्यवहार देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला होता. परंतु पावसाचे प्रमाण कमी वेळेत इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की त्यामुळे ही दुर्घटना घडली. या परिसरातील नागरिकांना पावसाळ्यापूर्वीच नोटिसा देखील देण्यात आल्या होत्या असे मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली.
12:48 July 18
मुंबई येथील दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत- मुख्यमंत्री
मुंबई - परिसरात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यू संदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये व जखमींवर मोफत उपचार केले जातील असे त्यांनी जाहीर केले. आजही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे, कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरू ठेवावे, मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
12:47 July 18
मुंबईतील जल शुद्धीकरण यंत्रणा बंद
मुंबई - मुसळधार पावसामुळे पालिकेच्या भांडुप संकुलमधील जल शुद्धीकरण यंत्रणा बंद झाली आहे.
11:56 July 18
गृहमंत्री अमित शाह यांची केले दु:ख व्यक्त
गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
11:22 July 18
मुंबईत ३ दुर्घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू
मुंबई - परिसरात रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घर आणि घरांच्या भिंती कोसळण्याच्या ३ दुर्घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे. वाशी नाका येथे दरड कोसळ्याने 15 जणांचा मृत्यू झाला तर विक्रोळी परिसरातील सूर्या नगर येथे डोंगरावर असलेल्या 4 ते 5 झोपड्या कोसळल्या आहेत. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुलुंडमध्येही घराची भिंत कोसळून एका १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. मुंबईत रविवारी पहाटेपासून मृत्यूचे तांडव सुरूच असून यात आतापर्यंत 21 बळी गेले आहेत.
10:50 July 18
चेंबूर दुर्घटनेतील मृत्यूचा आकडा पोहचला 15 वर
मुंबई - चेंबूर वाशी नाका दुर्घटनेतील मृत्यूचा आकडा हा 15 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत एकूण 17 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. दोन जणांवर उपचार त्यांना करून घरी सोडण्यात आले आहे. एनडीआरएफ टीमकडून बचाव कार्य सुरू आहे.
10:40 July 18
विहार तलाव ओव्हर फ्लो
मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव सकाळी 9 वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. या आधी तुळसी तलाव भरून वाहू लागला होता. यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीची संकट काही अंशी दूर झाले आहे.
09:34 July 18
मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूकीचा खोळंबा
मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या रुळावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्यामुळे रेल्वे वाहतूकीचा खोळंबा झाला असून 17 रेल्वे गाड्या ह्या काही कालवधीसाठी थांवण्यात आल्या आहेत. रेल्वे रुळावरील पाणी काढण्याचे काम रेल्वे कर्मचारी करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
09:33 July 18
24 तासात मुंबई शहरात 176.96 मिलिमीटर पाऊस
मुंबई - काल रात्री 11 ते मध्यरात्री 3 वाजतापर्यंत मुसळधार पाऊस झाला आहे. काल शनिवारी सकाळी 8 ते आज रविवारी सकाळी 8 या 24 तासात मुंबई शहरात 176.96 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 195.48 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 204.07 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
09:12 July 18
विक्रोळीत तीन जणांचा मृत्यू, दोन जण जखमी
मुंबई - विक्रोळी सूर्या नगर येथील डोंगरावर असलेल्या 4 ते 5 झोपड्या कोसळल्या आहेत. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण हे जखमी झाले आहेत. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
08:56 July 18
चेंबूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला
मुंबई - चेंबूर परिसरात झालेल्या दुर्घटनेत मृतांच्या आकड्यात वाढ झाली असून ती आता 11 वरून 12 वर पोहचली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी एका जणाचा मृतदेह सापडला आहे. अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे.
08:05 July 18
झोपडपट्टीतील सुमारे चार ते पाच घरांवर पडला ढिगारा
मुंबई - मुंबईतील चेंबूर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. चेंबूरच्या भारत नगर परिसरात दरड कोसळली आहे. ही दरड तटबंदीच्या भिंतीवर कोसळ्याने या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे अकरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एनडीआरएफने दिली आहे. रात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडली असावी अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. तटबंदीचा ढिगारा हा भारत नगर परिसरातील झोपडपट्टीतील सुमारे चार ते पाच घरांवर हा पडला. त्यामुळे ढिगाऱ्याखाली दबून ११ जणांचा मृत्यू झाला असून अजून काही नागरिक अडकले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे.
07:48 July 18
चेंबूर येथे दरड कोसळून 15 जण ठार, NDRF कडून बचावकार्य सुरु
मुंबई - चेंबूरच्या भारत नगर भागात दरड कोसळल्याने तटबंदीची भिंत कोसळून कोसळली आहे. त्या भिंतीच्या ढिगाऱ्यात 11 जण ठार झाले आहेत. अशी माहिती एनडीआरएफने दिली आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.