मुंबई - येथील दादरमधील शिवाजी मंदिर याठिकाणी आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या मुलांना यावर्षी आरक्षण नाकारल्याचा महत्वाचा मुद्दा चर्चेला असणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाची आज मुंबईत राज्यस्तरीय बैठक - Medical
वैद्यकीय शिक्षणात यावर्षी मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्याने त्यांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आज सरकारला २ दिवसाचा अल्टीमेटम देणार आहे.
मुंबई - येथील दादरमधील शिवाजी मंदिर याठिकाणी आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या मुलांना यावर्षी आरक्षण नाकारल्याचा महत्वाचा मुद्दा चर्चेला असणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाची आज राज्यस्तरीय बैठक
मुंबई - येथील दादरमधील शिवाजी मंदिर याठिकाणी आज मराठा क्रांती मोर्च्याची राज्यस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या मुलांना यावर्षी आरक्षण नाकारल्याचा महत्वाचा मुद्दा चर्चेला असणार आहे.
या बैठकीत एकंदरीत मराठा समाजाचे आरक्षण, कोर्टात चालू असलेली केस आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचा विषय हे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. विद्यार्थ्यांचे अॅडमिशन रद्द झाल्याने त्यांचे वर्ष वाया जाऊ शकते. त्यामुळे आजच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चा सरकारला २ दिवसाचा अल्टीमेटम देणार आहे.
विद्यार्थ्यांच्या जागेचा (Seats) प्रश्न जर सोडवला नाहीतर मराठा समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार आहे. जोपर्यंत मराठा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या बैठकीतून कोणीही जाणार नाही, असा निर्णय मराठा क्रांती मोर्चेच्यावतीने घेण्यात आले आहे.
Conclusion: