ETV Bharat / state

'पुढील पंचवीस वर्षे महाराष्ट्राचा गाडा पुढे न्यायचा आहे' - शरद पवार बातमी

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारमध्ये नक्की काय होईल यावर लोक बोलत होते. मात्र, सत्ता हातात घेऊन एक वर्षे झाले. माझ्या राजकीय आयुष्यात सरकारची इतकी चिकित्सा माध्यमांनी केल्याचे पाहिले नाही. यासाठी अनेकांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यामुळे चिकित्सा करण्याची भूमिका पत्रकारांना घ्यावी लागली, असे खासदार शरद पवार म्हणाले.

शरद पवार
शरद पवार
author img

By

Published : Dec 3, 2020, 10:32 PM IST

Updated : Dec 3, 2020, 10:51 PM IST

मुंबई - जनतेची कामे करणाऱ्यांना जनता कायम पसंत करत असते. यामुळे केवळ पाच वर्षेच नाही तर पुढील पंचवीस वर्षे महाराष्ट्राचा गाडा आपल्याला पुढे न्यायचा आहे. यामुळे हे सरकार पुढील अनेक वर्षे चालणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी गुरूवारी (दि. 3 डिसेंबर) व्यक्त केला.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षेपूर्तीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून गुरुवारी (दि. 3 डिसेंबर) वर्षेपूर्तीच्या कामकाजाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारमध्ये नक्की काय होईल यावर लोक बोलत होते. मात्र, सत्ता हातात घेऊन एक वर्षे झाले. माझ्या राजकीय आयुष्यात सरकारची इतकी चिकित्सा माध्यमांनी केल्याचे पाहिले नाही. यासाठी अनेकांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्यामुळे चिकित्सा करण्याची भूमिका पत्रकारांना घ्यावी लागली.

सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक संकटाची मालिका सुरू झाली

सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक प्रकारच्या संकटाची मालिका सुरू झाली. शेती, शेतकरी संकटात होता. अनेक जिल्हे अडचणीत आले होते. पण, सरकारने वेळीच संकटातून मार्ग काढल्यामुळे राज्यात बळीराजा रस्त्यावर आला नाही हे एक प्रकारच्या चमत्कारासारखे हेाते, असेही पवार म्हणाले. अनेक प्रकारच्या आलेल्या संकटातून सरकार सरकार बाहेर निघेल की नाही अशी दबक्या आवाजात चर्चा होती. पण, सर्वांनी एकत्र मिळून काम केले. राज्यात पुन्हा एकदा कारखाने सुरू करून हाताला काम कसे राहील याची सरकारने काळजी घेतली म्हणून कारखानदारी चालली, उद्योग सुरू राहिले. यात लोकांचा सहभाग होता. त्यामुळे हा महाविकास आघाडीच्या या जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे सहकार्य लाभले असल्याचेही ते म्हणाले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत या सरकारला शिक्षित लोकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे लोकांनी हे सरकार पसंत केले असल्याचे यातून स्पष्ट होते आहे. यामुळे सरकारमधील सर्वच मंत्री, नेते अभिनंदनास पात्र आहेत, असेही पवार यांनी सांगितले.

केंद्राच्या नाकर्तेपणावर टीका

आज दहा दिवस झाले. उत्तर भारतातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात ते आक्रोश करत असतानाही त्यांच्याकडे केंद्रातील राज्यकर्त्यांनी लक्ष दिले नाही. यामुळे देशाच्या बाहेरील लोकांनी याची दखल घेतली आहे. तरी सरकार मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप पवार केंद्र सरकारवर केला.

हेही वाचा - 'आमच्याकडे चौथे चाक हे जनतेचे, आम्ही हा रथ पुढे नेत आहोत'

हेही वाचा - विधानसभा अधिवेशन दोनच दिवसाचे; सरकार चर्चेतून पळ काढत असल्याचा फडणवीसांचा आरोप

Last Updated : Dec 3, 2020, 10:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.