ETV Bharat / state

MP Sanjay Raut on Election Result : जिथे हरभरे तिथे घोडे - खासदार संजय राऊत - गेम

शनिवारी ( दि. 11 जून ) हायहोल्टेज ड्रामा झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत शिवसेनेचा 'गेम' कोणी केला ? या चर्चांना सध्या उधाण आहे. या सोबतच आणखी एक महत्त्वाचा विषय चर्चेला आहे तो म्हणजे संजय राऊत. शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊतही या निवडणुकीत काठावर निवडून आल्याने राऊत यांचाही 'गेम' करण्याचा प्लॅन होता का ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता खुद्द संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी प्रतिक्रिया दिली असून ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 12, 2022, 12:39 PM IST

Updated : Jun 12, 2022, 2:36 PM IST

मुंबई - "घोडे बाजारामध्ये जी लोकं उभी होती त्यांची सहा सात मते आम्ही घेऊ शकलो नाही. आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांचे एकही मत फुटले नाही. कोणी शब्द देऊन दगाबाजी केली आहे, त्यांची नावे आमच्याकडे आहेत. या निवडणुकीत आम्ही व्यापार केला नाही. ज्यांना पहाटेची सवय आहे त्यांचा पहाटेचा उपक्रम होता त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मी माझ्या पक्षाने दिलेल्या 42 मतांवर लढत होतो. त्यातले एक माझे एक मत बाद केले. घोडे बाजारात या घोड्यांमुळे सरकारला कुठलाही धोका होत नाही. घोडे जिथे असतील तिथेही असतील जिथे हरभरे टाकतील तिथे जातात, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी दिली.

बोलताना खासदार संजय राऊत

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून निवडणूक - पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "समोरच्याने पैशाची ताकद व केंद्रीय तपास यंत्रणांची ताकद वापरून घोडेबाजार केला. महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासली. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची नोंद ठाकरे सरकारही घेत आहे. आपण जनतेच्या न्यायालयात आहोत. हा घोडेबाजाराचा मेंडेट असतो. काही लोक माझ्या मतांवर डोळा ठेवून होते. पण, तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला."

संजय पवार यांच्या पराभवाने मुख्यमंत्री व्यथित - "संजय पवार हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पराभवामुळे मुख्यमंत्रीही व्यतीत झाले आहेत. अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्षश्रेष्ठी ठेवत असतो.", असे राऊत म्हणाले. तर वसईच्या हितेंद्र ठाकूर यांच्या बाबत बोलताना ते म्हणाले की, "वसईचे हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. देवेंद्र भुयार यांची मदत देखील आम्हाला मिळाली नाहीत."

महाडिक यांच्या जागी संभाजीराजे छत्रपतींना निवडून आणायला पाहिजे होते - दरम्यान, याच निवडणुकीत संभाजी राजे छत्रपती यांचा विषय देखील चर्चेत होता. त्यांना उमेदवारी नाकारली म्हणून भाजपकडून निवडणुका झाल्यानंतर देखील शिवसेनेवर टीका केली जात आहे. या टिकांचा समाचारही संजय राऊत यांनी घेतला. ते म्हणाले की, "तुम्ही दुसऱ्याची फळ चाखत बसलेले आहेत. तुम्ही त्यांना का उमेदवारी नाही दिली ? तुमचे राजेंवर इतके प्रेम होते तर धनंजय महाडिक यांच्या जागी त्यांना निवडून आणायला पाहिजे होते."

शिवसेना आणि मुंडे परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध - "गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असल्याने पंकजा मुंडे यांची चिंता आम्हाला करावी लागते. गोपीनाथ मुंडे व शिवसेनेचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मुंडे कुटुंबाच्या शिवसेनेशी आणि एकूणच ठाकरे परिवाराचे जिव्हाळ्याच्या नाते आहे. त्यामुळे आम्ही ही चिंता व्यक्त केली. मागील पंचवीस वर्षे जी काही शिवसेना आणि भाजपची युती टिकली ती याच गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे त्यांच्या कन्येची काळजी करणे हे सहाजिकच आहे आहे.", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा - Success story Of a Poor Woman : बुरूड समाजातील महिला ७० व्या वर्षी बारावी पास, व्यवसाय करत केली परीक्षेची तयारी

Last Updated : Jun 12, 2022, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.