ETV Bharat / state

अरुण जेटलींच्या जाण्याने देशाने चांगला वकील गमावला - खासदार संजय राऊत - अरुण जेटली निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज( शनिवारी) निधन झाले आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच देशाने एक चांगला वकील गमावला असल्याचे ते म्हणाले.

खासदार संजय राऊत
author img

By

Published : Aug 24, 2019, 3:48 PM IST

मुंबई - अरुण जेटली यांच्या निधनाने देशाने एक चांगला वकील गमावला आहे. देश संकटात आला तेव्हा जेटली ठामपणे देशाची वकिली करण्यासाठी संसदेत आणि बाहेर उभे राहिले, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दुःख व्यक्त केले.

अरुण जेटली यांचे जाणे दुःखद, देशाने चांगला वकील गमावला - खासदार संजय राऊत

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज( शनिवारी) निधन झाले आहे. थकवा, श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थ वाटू लागल्याने जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना ९ ऑगस्टला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे आज दुपारी १२ वाजून ०७ मिनिटांनी निधन झाल्याचे एम्स रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. अनेक महिने आजाराशी सामना करणाऱ्या जेटलींनी आज वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळेच राऊत यांनी जेटलींच्या आठवणींना उजाळा दिला.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंघ ठेवण्यात जेटली यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे आघाडीच्या प्रत्येक घटकांसोबत व्यक्तिगत संबंध होते. गेल्या 2014 साली शिवसेना आणि भाजप युती तुटली. त्यावेळी त्यांच्या मनातली अस्वस्थता पाहिली असल्याचे राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्त्व करावे यासाठी जेटली यांची भूमिका महत्त्वाची होती, असेही त्यांनी सांगितले.

Intro:मुंबई

अरुण जेठली यांच्या निधनाने देशाने आपला वकील गमावला आहे. जेव्हा जेव्हा देश संकटात आला तेव्हा जेठली हे ठामपणे देशाची वकिली करण्यासाठी संसदेत आणि बाहेर उभे राहिले असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
Body:राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंघ ठेवण्यात जेठली यांचे योगदान मोठे आहे. आघाडीच्या प्रत्येक घटकाची त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. 2014 साली जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटली तेव्हा त्यांच्या मनातली अस्वस्थता मी पाहिली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतूत्व करावे यासाठी जेठली यांची भूमिका महत्त्वाची होती असेही राऊत यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.