ETV Bharat / state

'ईडी नोटीस'प्रकरणी राऊत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - ईडी बातमी

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने (सक्त वसुली संचनालय) नोटीस बजावली आहे. याबाबत आज राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती सेनेच्या सुत्रांकडून मिळाली आहे.

प्रातिनिधी छायाचित्र
प्रातिनिधी छायाचित्र
author img

By

Published : Dec 28, 2020, 7:15 PM IST

Updated : Dec 28, 2020, 10:32 PM IST

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने (सक्त वसुली संचनालय) नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोघांची ईडीच्या नोटिसीबाबत चर्चा झाल्याची माहिती शिवसेना सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राऊत यांचा भाजपावर आरोप

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने रविवारी (दि. 27 डिसें.) नोटीस बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी (29 डिसें.) त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत बोलताना आम्हाला अशी कोणतीही नोटीस मिळाली नाही. नोटीस मिळाल्याचे भाजपाकडूनच सांगण्यात येत आहे, त्यामुळे नोटीस शोधायला मी माझा माणूस त्यांच्या कार्यालयात पाठवला आहे, असा पलटवार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. ‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नोटिसीबाबत चर्चा

सोमवारी (दि. 28 डिसें.) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांची बैठक वर्षा निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीदरम्यान संजय राऊत यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांच्या पत्नीला आलेल्या नोटिसीबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - १२.५ टक्के विकसित भूखंड मिळण्याचा जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा मार्ग मोकळा

हेही वाचा - धक्कादायक! म्हाडा ट्रान्झिट कॅम्पच्या नावाखाली फसवणूक; घरांची 15 लाखांत बेकायदा विक्री!

Last Updated : Dec 28, 2020, 10:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.