ETV Bharat / state

टीआरपी घोटाळा : 'अर्णब गोस्वामीचा बोलावता धनी वेगळाच'

author img

By

Published : Oct 9, 2020, 2:32 PM IST

मुंबई पोलिसांकडून टीव्ही वाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा, यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवत ते चॅनल लावण्यास सांगत असल्याचे उघड झाले आहे. त्यावर संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले.

sanjay raut
संजय राऊत

मुंबई - पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला आहे. यात रिपब्लिक टीव्हीचेही नाव समोर आले आहे. टीआरपी घोटाळा हा ३० हजार कोटींचा असून हा स्पेक्ट्रम सारखाच असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. रिपब्लिक टीव्हीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामीचा बोलावता धनी वेगळाच असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला. त्याचा तपास सध्या सुरू आहे हे सुडाचे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. मुंबई पोलीस अत्यंत प्रोफेशनल आहेत. ते कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडत नाहीत. त्यांचा तपास निःपक्ष असतो. ते कधीही सूडाच्या भावनेने तपास करत नाहीत, असे राऊत म्हणाले. मुंबई पोलिसांकडून जी कारवाई झाली ती सुडाची असेल, तर रिपब्लिक चॅनलकडून जो प्रकार सुरू होता ती काय सद्भावना का? असा प्रश्न राऊत यांनी विचारला. लोकांना चॅनेल बघण्यासाठी पैसे वाटले, ते ड्रग्स रॅकेटमधून आले, असे कुणी म्हटले तर चालेल का, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

अश्विनीकुमार सीबीआयचे प्रमुख असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला. ते सर्व गुन्हे वादग्रस्त होते. अशा व्यक्तीने आत्महत्या करावी असे काय घडले? असा प्रश्न राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. सीबीआयचे अधिकारी मनाने खंबीर असतात. अश्विनी कुमार आत्महत्या करतात व त्या प्रकरणाची फाईल दोन तासांत बंदही होते. असे का झाले, असा कोणत्याही किंचाळणाऱ्या चॅनलला प्रश्न पडू नये. मीडियाने एका अभिनेत्याच्या आत्महत्येनंतर वादळ निर्माण केले. मात्र, सीबीआयच्या माजी संचालकांच्या आत्महत्येनंतर ते शांत आहेत, याचे मला आश्चर्य वाटत असल्याचे राऊत म्हणाले.

बिहारमध्ये जवळपास 50 जागा लढवण्याची तयारी आहे. मी स्वतः पाटण्यात जाईन. माझ्याबरोबर नेते-खासदार असतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-मंत्री आदित्य ठाकरे व्हर्च्युअल रॅलीद्वारे संबोधन करतील, असेही राऊत यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.