ETV Bharat / state

Sanjay Raut on Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यात यावा; खासदार संजय राऊतांचे केंद्र सरकारला आवाहन

author img

By

Published : Feb 26, 2023, 7:17 PM IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना केंद्र सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करावा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी खासदार राऊत यांनी हे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.

Sanjay Raut on Savarkar
संजय राऊत

मुंबई: खासदार संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आरोप करत आहेत. मात्र आज त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यातिथिनिमित्त मोठे आवाहन केले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर हे महाराष्ट्राचे शूर सुपुत्र होते. वीर सावरकर हे महाराष्ट्राचे महापुरुष होते. वीर सावरकरांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्याचे आवाहन खासदार राऊत यांनी केले.

एमआयएम व भाजपवर टीका: एमआयएम पक्षाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत पार पडत आहे. यावरून संजय राऊतांनी एमआयएम पक्षावर जोरदार टीका केली आहे. एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मुस्लिम लोकांना चिथावणीखोर भाषण देत आहेत. ते पुढे म्हणाले की, भाजप आणि असदुद्दीन ओवेसी हे 'राम और श्याम की जोडी' आहेत. शिवसेना एकटीच लढेल. असदुद्दीन ओवेसी काळी शेरबानी घालून मुस्लिमांना भडकवत आहेत. हिंदूंपासून वेगळे झाल्यास मुस्लिमांना त्रास होईल, असेही ते म्हणाले. देशात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, मुस्लिमांनी हिंदूंपासून वेगळे होऊ नये; अन्यथा मुस्लिमांचे नुकसान होईल, असे राऊत म्हणाले.

ओवेसींनी केली होती टीका: एमआयएम पक्षाचे प्रमुख तथा लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर ठाण्यातील सभेत जोरदार टीका केली होती. ते म्हणाले होते की, जेव्हा राष्ट्रवादीचे अजित पवार, सुप्रिया सुळे नेते होऊ शकतात. उद्धव ठाकरे हे केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असल्याच्या बळावर नेते होऊ शकतात. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हे नेते होऊ शकतात. महाराष्ट्रातील मुस्लिम व्यक्ती शरद पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे होऊ शकत नाहीत का, असा सवाल ओवेसी यांनी केला होता.

वीर सावकर यांची पुण्यतिथी: विनायक दामोदर सावरकर हे वीर सावरकर म्हणून ओळखले जातात. विनायक दामोदर सावरकर हे प्रखर हिंदू विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, वकिल, तत्त्वज्ञ, स्वातंत्र्यसेनानी यासोबतच लेखक भाषाकारही होते. आज 26 फेब्रुवारी रोजी त्यांची 57वी पुण्यतिथी आहे.

वीर सावरकर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते: वीर सावरकर यांनी 1909 मध्ये लिहिलेल्या 'The Indian War of Independence-1857' या पुस्तकात ब्रिटिश सरकारविरुद्धचा लढा पहिला स्वातंत्र्ययुद्ध म्हणून घोषित केले आहे. वीर सावरकर 1911 ते 1921 पर्यंत अंदमान तुरुंगात राहिले आणि 1921 मध्ये ते मायदेशी परतले व त्यानंतर तीन वर्षे तुरुंगात घालवली होती. तुरुंगात ‘हिंदुत्व’ या विषयावर संशोधनात्मक पुस्तक देखील वीर सावरकर यांनी लिहिले. 1937 मध्ये त्यांची हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली व 1943 नंतर ते दादर, मुंबईत राहिले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी 9 ऑक्टोबर 1942 रोजी चर्चिल यांना समुद्री तार पाठवला आणि ते आयुष्यभर अखंड भारताच्या बाजूने उभे राहिले. स्वातंत्र्याच्या साधनांबद्दल गांधीजी आणि सावरकरांचे मत भिन्न होते, असे सांगितले जाते.

हेही वाचा: CM Food Bill : अबब! मुख्यमंत्री शिंदेंच्या जेवणाचे बिल 2 कोटी; चहात सोन्याचे पाणी वापरले का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.