मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहलेल्या वादग्रस्त पुस्तकावरुन भाजपवर चांगलीच टीका होत आहे. या प्रकारावर वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते विधाने करत आहेत. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवत, भाजपमध्ये शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना हा प्रकार मान्य आहे का? असा सवाल केला आहे. या त्यांच्या वक्तव्यावर खासदार छत्रपती संभाजीराजे चांगलेच संतापले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदींशी करणारे पुस्तक आज (रविवार) भाजपने प्रकाशीत केले आहे. या प्रकाराबद्दल छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे, असे विधान संजय राऊत यांनी ट्वीटरवर केले होते. त्यांच्या या विधानाचा संभाजीराजेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धवजी त्या संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही, असे विधान संभाजीराजेंनी ट्वीटरवर केले आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-
उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray @ShivSena
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray @ShivSena
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक वेळी छत्रपती घरण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याने आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंती, सिंदखेड राजा मध्ये काय बोललो आहे ते. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही.@OfficeofUT @AUThackeray @ShivSena
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) January 12, 2020
संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मा. छत्रपती संभाजी राजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असे कोणते विधान केले? ज्या मुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहिल. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र अशा आशयाचे संजय राऊत यांनी ट्वीट करत पुन्हा संभाजीराजेंना सवाल केला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
शिवाजी महाराजांचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली आहे. हे भाजपमध्ये शिरलेलया छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?” असा प्रश्न राऊत यांनी ट्विटरवर विचारला होता. ही टीका खासदार संभाजीराजे भोसले यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यातूनच त्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.