ETV Bharat / state

खासदार राहुल शेवाळेंनी माहुल, ट्रॉम्बे येथील जेट्टीच्या नुकसानीची केली पाहणी - Trombay jetty inspection MP Rahul Shewale

आज दुपारी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी ट्रॉम्बे आणि माहूल येथील जेट्टीच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने कोळी बांधवांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

MP Rahul Shewale inspects jetty
खासदार राहुल शेवाळे जेट्टी पाहणी
author img

By

Published : May 17, 2021, 10:15 PM IST

मुंबई - आज दुपारी दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी ट्रॉम्बे आणि माहूल येथील जेट्टीच्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने कोळी बांधवांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

जेट्टीची पाहणी करताना खासदार राहुल शेवाळे

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी वॉर रुममध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची गरज - प्रवीण दरेकर

आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये माहुल आणि ट्रॉम्बे या दोन भागांमध्ये मासेमारी करण्यासाठी जेट्टी उभारण्यात आलेल्या आहे आणि आज या वादळामुळे कोळी लोकांच्या जेट्टीमधील बोटींचे, तसेच जेट्टीच्या शेडचे नुकसान झालेले आहे. सदर ठिकाणी खासदार राहुल शेवाळे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

वादळाच्या पार्श्वभूमीवर ही तयारी

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याने वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला. तसेच, प्रशासनाने नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आवाहन केले. वादळामुळे प्रभावित झालेल्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवता यावे म्हणून मुंबईत 5 ठिकाणी शेल्टर होम बनविण्यात आले. तसेच, एनडीआरएफच्या तीन पथकांसह फायर ब्रिगेडची सहा पथकेही तैनात करण्यात आली.

मोनोरेल बंद, लोकल ठप्प, विमानसेवा बंद

मुंबईत 11 तासांसाठी विमान सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच, सकाळी काही फ्लाईट डायव्हर्ट करण्यात आले होते. त्या शिवाय मोनोरेल सेवाही बंद ठेवण्यात आली. तर, अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवाही विस्कळीत झाली.

आज पहाटेपासूनच प्रचंड वारा

मुंबईत कालपासूनच तौक्ते चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. आज पहाटेपासूनच प्रचंड वारा आणि त्याचबरोबर तुफान पाऊस सुरू झाल्याने अवघ्या काही तासांतच मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले. ढगाळ वातावरण आणि पावसाचे पाणी भरू लागल्याने लोकल सेवा ठप्प केली. वादळामुळे विमान सेवाही बंद ठेवण्यात आली. तसेच, सकाळपासून रौद्ररूप धारण केलेल्या वादळामुळे राज्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. मुंबईवरील वादळाचा धोका अजून टळलेला नसल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - नायर रुग्णालयाला तौक्ते चक्रीवादळाचा फटका; पावसामुळे कोविड ओपीडी, लसीकरण केंद्रात पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.