ETV Bharat / state

MP Praful Patel : शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्यावर प्रफुल पटेल म्हणाले...

MP Praful Patel : आमदार अपात्रेबाबत शरद पवार गट (Sharad Pawar Group) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेलाय. यावर अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष (Working President of Ajit Pawar Group) आणि खासदार प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला न्यायालयात जायचा अधिकार आहे; मात्र न्यायालयात जाण्यासंदर्भात काही नियम असतात. एक प्रक्रियेचा भाग असतो आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही निर्णय घेतल्याचा पुनश्च उल्लेख प्रफुल पटेल यांनी केला आहे.

MP Praful Patel
प्रफुल पटेल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 5:26 PM IST

मुंबई MP Praful Patel : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असून पक्ष एनडीए अर्थात भाजपासोबत आहे. राज्यात आणि देशात आगामी विधानसभा आणि लोकसभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. बहुमताने लोकसभेत एनडीए निवडून येईल आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील असा विश्वास प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. जनतेचा कौल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला.

राज्यातील 53 पैकी 43 आमदार आमच्या सोबत : केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. सर्वोच्च न्यायालयात दर्जाचा अधिकार निवडणूक आयोगाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. पक्षातील महाराष्ट्रातले 53 पैकी 43 आमदार अजित पवारांसोबत आहे. निवडणूक आयोगाला आम्ही जे कागदपत्र सादर केलेली आहेत. तसंच तज्ज्ञ वकिलांच्या सल्ल्यानुसार तथ्य जे आहेत त्या आधारे नक्कीच निवडणूक आयोग आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देतील, असा ठाम विश्वास अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल पटेल यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार संघटनात्मक निवडणुका व्हायला पाहिजे होत्या. त्या झाल्या नाहीत. इतर राज्यांच सोडा महाराष्ट्रात देखील संघटनेतील अंतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. कागदोपत्री त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना जे अधिकार देण्यात आले होते ते माझ्या सहीने मी पत्र पाठवून दिले होते. त्यांच्यापेक्षा राज्याचे अध्यक्ष आमच्याकडे जास्त असेल, असे प्रफुल पटेल म्हणाले.

वकिलांच्या भाषेवर बोलणं उचित होणार नाही : राजकीय निवड प्रक्रिया कोणत्या आधारे केव्हा करण्यात आली कशी झाली त्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि नागालँड मध्ये स्थिती काय आहे ही गोष्ट महत्त्वाची असणार आहे. जेव्हा याचिका दाखल होतात त्यातील वकिलांच्या भाषेवर फार काही बोलणं उचित होणार नसल्याचंही पटेल यांनी म्हटलं आहे. 30 जून रोजीचे आमच्या सोबत असलेल्या आमदारांची प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केलेली आहेत. जयंत पाटील यांनी केलेला दावा अजित पवार गटाचे आमदार त्यांच्या संपर्कात असलेला दावा खोडून काढत उलट पक्षी शरद पवार गटाचे किती आमदार आमच्यासोबत आहे याचा आकडा आज सांगू इच्छित नसल्याचंही प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

आमच्याकडे जयंत पाटलांचं स्वागत होईल : शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रफुल पटेल म्हणाले की, प्रत्येकाला न्यायालयात जायचा अधिकार आहे; मात्र न्यायालयात जाण्यासंदर्भात काही नियम असतात. एक प्रक्रियेचा भाग असतो आणि या सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही निर्णय घेतल्याचा पुनश्च उल्लेख प्रफुल पटेल यांनी केला आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत आपलं मत व्यक्त करताना पटेल म्हणाले की, कोण कुठे जातंय याबाबत आपल्याला माहिती नाही. जयंत पाटील उद्या काय करतील, आमच्याकडे येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे.

हेही वाचा:

  1. Uddhav Thackeray On Nanded Death Case : राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा; कोरोना काळात लसींचा तुटवडा नव्हता, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
  2. Abu Azami IT Raid : अबू आझमींच्या मालमत्तांवर आयकर विभागाची छापेमारी, अबू आझमी म्हणाले...
  3. Anna Hazare On Jitendra Awhad : अण्णा हजारे आणि जितेंद्र आव्हाड वाद पेटला; अण्णा हजारे दाखल करणार अब्रू नुकसानीचा खटला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.