ETV Bharat / state

चार भिंतीत नक्की काय झाले याविषयी अधिक भाष्य करता येणार नाही - अरविंद सावंत - Arvind Sawant on maratha reservation

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.

अरविंद सावंत
नक्की चार भिंतीत काय झाले या विषयी अधिक भाष्य करता येणार नाही - अरविंद सावंत
author img

By

Published : Jun 8, 2021, 3:10 PM IST

Updated : Jun 8, 2021, 4:27 PM IST

मुंबई - मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटी व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक, अर्धा तास चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले, की समाजकारण म्हणून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची वैयक्तिक भेट झाली असावी, पण नक्की चार भिंतीत काय झाले या विषयी अधिक भाष्य करता येणार नाही.

अनेक वर्षापासून भाजपा बरोबर संबंध
राजकीय नाते नाही, आम्ही वैयक्तिक नाते संबंध जपणारी माणसं आहोत, अनेक वर्षापासून भाजपाबरोबर संबंध होते, हे नाकारता येत नाही. पण आता समाजकारण म्हणून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची वैयक्तिक भेट झाली असावी, पण नक्की चार भिंतीत काय झाले या विषयी अधिक भाष्य करता येणार नाही, असे सावंत यांनी भेटीविषयी सांगितले.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये अर्धा तास एकांतात चर्चा

पंतप्रधान कार्यालयातील भेटीची वेळ मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पंतप्रधान कार्यालयात पोहचले होते. नरेंद्र मोदी यांच्यासोबत अकरा वाजता त्यांची बैठक सुरू झाली. मराठा आरक्षणासह विविध महाराष्ट्रातील विषयासंदर्भात ही बैठक तब्बल पावणे दोन तास चालली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अर्धा तास एकांतात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे.

Last Updated : Jun 8, 2021, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.