ETV Bharat / state

राज्यात 'या' जिल्ह्यात आहेत सर्वाधिक मतदान केंद्र

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७ हजार ६०० हून अधिक मतदान केंद्र आहेत. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे.

राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्र
author img

By

Published : Mar 31, 2019, 10:37 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सुमारे ९५ हजाराहून अधिक असलेल्या मतदान केंद्रांपैकी सुमारे ६१ हजार मतदान केंद्र ग्रामीण तर ३४ हजाराहून अधिक शहरी भागात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ७ हजार ६०० हून अधिक मतदान केंद्र आहेत. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. शहरी भागात मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असून पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. राज्यात सुमारे १ हजार ३०० पेक्षा जास्त मतदान केंद्रे वन आणि अर्ध वन भागातील असून ९० हजार पेक्षा जास्त मतदान केंद्रे शाळा, महाविद्यालये आणि शासकीय इमारतींमध्ये आहेत.

निवडणूक प्रक्रियेतील अविभाज्य घटक म्हणून मतदान केंद्र ओळखले जाते. मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्र महत्त्वाची भूमिका बजावतात. बहुतांश मतदान केंद्र शासकीय इमारत अथवा शाळा, महाविद्यालयांमध्ये असतात. काही वेळेला तात्पुरत्या स्वरुपात मतदान केंद्र देखील उभारले जातात. यावर्षीच्या निवडणुकांसाठी सुमारे १ हजार १०० मतदान केंद्र तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आली आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध अत्यावश्यक सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्यात शहरी आणि ग्रामीण मतदान केंद्रांवर सारख्याच सुविधा दिल्या जातात. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर त्यामध्ये बदल केला जातो. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात ९५ हजार ४७३ एकूण मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये वाढ होऊ शकते.

  • जिल्हानिहाय मतदान केंद्रांची अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागातील संख्या (कंसांत एकुण संख्या)

नंदुरबार-११००, १९० (१३००), धुळे- १३००, ३०० (१६००), जळगाव-३०००, ५०० (३५००), बुलढाणा- १८००, ४०० (२२००), अकोला- ११००, ५०० (१६००), वाशिम- ९००, ८० (९८०), अमरावती- १९००, ६१७ (२६००), वर्धा-१०७६, २३८ (१३००), नागपूर-२१००, २२०० (४३००), भंडारा- १६५, ४० (१२०५), गोंदिया-११५३, ११२८ (१२८०), गडचिरोली-९२९,०१ (९३०), चंद्रपुर- ११७०, ८९० (२०७०), यवतमाळ- २२८०, २०० (२४९१), नांदेड -२४९५, ४६० (२९५०), हिंगोली-८६६, १३५ (१०००), परभणी - १०४०, ४५० (१५००), जालना-१३९०, २४० (१६३३), औरंगाबाद- १९५०, १००० (२९५७, नाशिक - २९८०, १४५० (४४४०), ठाणे - १२७३, ५२१५ (६४८८), मुंबई उपनगर -२८६, ७०११ (७२९७), मुंबई शहर - ०, २५९२ (२५९२), रायगड - २४७०, २२० (२६९३), पुणे - ३२८७, ४३७९ (७६६६), अहमदनगर -२९२२, ८०० (३७२२), बीड - १७८५, ५२६ (२३१०), लातूर - १९२५, ७० (१९९५), उस्मानाबाद - १३२२, १६० (१४९०), सोलापूर - २५८०, ८९० (३४८०) , सातारा - २७३८, २३० (२९७०), रत्नागिरी- १६७३, २६ (२६९९), सिंधुदुर्ग - ८९०, २१ (९१५), कोल्हापूर - २४९०, ८२० (३३२१, सांगली - १८९०, ५०० (२४००), पालघर - १८००, ३१० (२१२०) राज्यात सहाय्यकारी मतदान (ऑक्झिलरी) केंद्रांची संख्या निश्चितीनंतर एकूण मतदान केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Intro:Body:
MH_EC_VotingCenters31.3.19

राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान केंद्र
राज्यातील शाळा, शासकीय इमारतीत 90 हजाराहून अधिक मतदान केंद्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सुमारे 95 हजाराहून अधिक असलेल्या मतदान केंद्रांपैकी सुमारे 61 हजार मतदान केंद्र ग्रामीण तर 34 हजाराहून अधिक शहरी भागात आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 7 हजार 600 हून अधिक मतदान केंद्र आहेत. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. शहरी भागात मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान केंद्र असून पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील मतदान केंद्रांची संख्या जास्त आहे. राज्यात सुमारे 1300 पेक्षा जास्त मतदान केंद्र वन आणि अर्ध वन भागातील असून 90 हजार पेक्षा जास्त मतदान केंद्र शाळा, महाविद्यालये आणि शासकीय इमारतींमध्ये आहे.

निवडणूक प्रक्रियेतील अविभाज्य घटक म्हणून मतदान केंद्र ओळखले जाते. मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याकरीता मतदान केंद्र महत्वाची भूमिका बजावतात. बहुतांश मतदान केंद्र शासकीय इमारत अथवा शाळा, महाविद्यालयांमध्ये असतात. काही वेळेला तात्पुरत्या स्वरुपात मतदान केंद्र देखील उभारले जातात. यावर्षीच्या निवडणूकांसाठी सुमारे 1100 मतदान केंद्र तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध अत्यावश्यक सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. राज्यात शहरी आणि ग्रामीण मतदान केंद्रांवर सारख्याच सुविधा दिल्या जातात. मात्र स्थानिक परिस्थितीनुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर त्यामध्ये बदल केला जातो. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 95 हजार 473 एकूण मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये वाढ होऊ शकते.

जिल्हानिहाय मतदान केंद्रांची अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागातील संख्या (सुमारे) अशी (कंसांत एकुण संख्या) :नंदुरबार-1100, 190 (1300) ; धुळे-1300, 300 (1600) ; जळगाव-3000,500 (3500) ; बुलढाणा-1800,400 (2200) ;अकोला-1100,500 (1600) ; वाशिम-900, 80 (980) ; अमरावती-1900, 617 (2600); वर्धा-1076, 238 (1300) ; नागपूर-2100, 2200 (4300) ; भंडारा-1165, 40 (1205); गोंदिया-1153, 128 (1280) ;गडचिरोली-929, 01 (930) ; चंद्रपुर-1170, 890 (2070) ; यवतमाळ-2280, 200 (2491) ; नांदेड-2495, 460 (2950) ;हिंगोली-866, 135 (1000) ; परभणी-1040, 450 (1500) ; जालना-1390, 240 (1633); औरंगाबाद-1950, 1000 (2957) ;नाशिक-2980, 1450 (4440) ; ठाणे-1273, 5215 (6488) ; मुंबई उपनगर-286, 7011 (7297) ; मुंबई शहर-0, 2592 (2592) ;रायगड-2470, 220 (2693) ; पुणे-3287, 4379 (7666) ; अहमदनगर-2922, 800 (3722) ; बीड-1785, 526 (2310) ;लातूर-1925, 70 (1995) ;उस्मानाबाद-1322, 160 (1490) ;सोलापूर-2580, 890 (3480) ;सातारा-2738, 230 (2970) ;रत्नागिरी-1673, 26 (2699) ; सिंधुदुर्ग-890, 21 (915) ; कोल्हापूर-2490, 820 (3321) ;सांगली-1890, 500 (2400) ;पालघर-1800, 310 (2120). राज्यात सहाय्यकारी मतदान (ऑक्झिलरी) केंद्रांची संख्या निश्चितीनंतर एकूण मतदान केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.