एक्झिट पोलच्या निकालानंतर विरोधक घेणार निवडणूक आयोगाची भेट
नवी दिल्ली - एक्झिट पोलच्या निकालानंतर विरोधी पक्षांनी पवित्रा बदलण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता लक्षात घेत त्यांनी आपासांतील मंगळवारची बैठक रद्द केली आहे. याऐवजी विरोधकांनी मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेण्याची तयारी केली आहे. या वेळी, ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट स्लिप्स जुळवून पाहण्याचा मुद्दा मांडला जाणार आहे. टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू याचे नेतृत्व करणार आहेत. वाचा सविस्तर...
मुंबईवरील वीजसंकट टळले; बील थकवल्याने टाटाने पाठवली होती नोटीस
मुंबई - बेस्टने टाटाकडून खरेदी केलेल्या विजेचे पैसे न भरल्याने २१ मे'पासून वीज पुरवठा न करण्याचा निर्णय टाटाने घेतला होता. त्यानुसार टाटाने वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस दिल्याने बेस्ट समितीमधील सर्व पक्षीय सदस्यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. पालिका आयुक्तांच्या मध्यस्तीनंतर वीज खंडित न करण्यास टाटाने अनुकूलता दर्शवल्याने मुंबईवरील विजेचे संकट टळले आहे. वाचा सविस्तर...
एक्झिट पोलवर आम्हाला विश्वास नाही - मल्लिकार्जुन खरगे
मुंबई - आम्हाला राज्यात आणि देशातही चांगल्या जागा निश्चितच मिळतील. यासाठीचे चित्र 23 मे रोजी पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी मतदान रात्री आठ वाजेपर्यंत चालू होते. परंतु, त्यापूर्वी सहा वाजता अनेक वृत्तसंस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर करून आकडाही जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या या निष्कर्षावर आम्हाला बिलकुल विश्वास नाही. त्यापेक्षा मतदान सुरू झाल्यापासून संपेपर्यंत बूथवर थांबलेल्या आमच्या बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांसह, आमदार, पदाधिकारी यांनी दिलेल्या अहवालावर आमचा विश्वास असल्याचे काँग्रेसचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वाचा सविस्तर...
कार्यकर्त्यांनी एक्झिट पोलच्या निकालांकडे लक्ष देऊ नये, मतमोजणी केंद्रावर नजर ठेवावी - प्रियांका गांधी
नवी दिल्ली - सर्व प्रमुख वाहिन्यांवरती दाखवण्यात येणाऱ्या एक्झिट पोल्समध्ये भाजप-प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळणार असल्याचे अंदाज लावण्यात आले आहेत. यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी सोमवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना 'एक्झिट पोल्स आणि अफवांकडे लक्ष देऊ नये, असा सल्ला दिला आहे. एक्झिट पोल्समधून जाहीर करण्यात आलेल्या निकालांमुळे चिंता करत न बसता मतमोजणी केंद्रावर नजर ठेवावी,' असे प्रियांका यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...
अनुष्काचा आजार पुन्हा बळावला, 'या' आजाराने आहे त्रस्त
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती क्लीनिकमध्ये जाताना दिसत आहे. अनुष्का बऱ्याच काळापासून एका आजाराने त्रस्त आहे. यापूर्वीही तिच्या आजारासंबधीचे वृत्त समोर आले होते. याच आजारावर सध्या ती उपचार घेत आहे. वाचा सविस्तर...