ETV Bharat / state

आज...आत्ता... शनिवार सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर... - ETV Bharat

भारत आणि अफगाणिस्तानच्या संघात आज पहिल्यांदाच विश्वचषकाचा सामना होणार आहे, तर अमरीश पुरी यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने त्यांच्यासाठी खास डूडल बनवले आहे. शिवाय बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेतल्यास राजीनामा देणार असल्याचे उदयनराजे भोसले म्हणाले. एवढेच नाहीतर यवतमाळच्या ६ तालुक्यांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.

महत्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jun 22, 2019, 9:11 AM IST

Cricket Wc : अफगाणिस्तानला लोळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज

साऊदम्पटन - भारत आणि अफगाणिस्तानच्या संघात आज पहिल्यांदाच विश्वचषकाचा सामना होणार आहे. अफगाणिस्तान संघाने आत्तापर्यंत पाच सामने खेळले असून या पाचही सामन्यात अफगाणिस्तान संघाला पराभवाची चव चाखावी लागली. दुसरीकडे भारतीय संघ प्रचंड लयीत आहे. त्यामुळे आज भारतीय संघ अफगाणिस्तानच्या संघाला लोळवण्यास सज्ज झाला आहे. वाचा सविस्तर...

'मोगँबो खुष हुआ', अमरीश पुरी यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलचं खास डुडल

मुंबई - बॉलिवूडचे 'विलन' म्हणून वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमरीश पुरी यांचा आज जन्मदिवस आहे. अमरीश पुरी जेव्हाही पडद्यावर विलन म्हणून यायचे तेव्हा प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नव्हता. त्यांचा भारदस्त आवाज, डोळ्यातून निघणारा त्यांचा राग आणि त्यासोबतच त्यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना सिनेमागृहात खिळवून ठेवण्यास भाग पडत होता. त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलनेही खास डुडल करून त्यांना अभिवादन केले आहे. वाचा सविस्तर...

बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेणार असाल तर राजीनामा देतो - उदयनराजे

सातारा - लोकसभा मतदारसंघात आपल्याला खात्रीने साडेतीन ते पावणे चार लाखाचे मताधिक्य आहे, असा दावा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला आहे. मी राजीनामा देतो पुन्हा फेरमतदान होऊ दे, तितक्याच मताधिक्क्याने निवडून येईल, असे म्हणत त्यांनी बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का? असा सवाल निवडणूक आयोगाला केला आहे. वाचा सविस्तर...

यवतमाळच्या ६ तालुक्यांना भूकंपाचे सौम्य झटके, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यवतमाळ - आर्णी, महागाव, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, घाटंजी तालुक्यातील गावात शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाच्या तीव्रतेमुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील काही घरांना तडे गेले आहेत. तर महागाव तालुक्यातील, डोंगरगाव, हिवरा,फुलसावंगी, वरोडी, पोहंडूळ, धनोडा, पेढी, काळी (दौ), बोरी इजारा, साई, करंजखेड, कासारबेहळ, काळी टेंभी आणि चिल्ली अशा ६० गावात भूकंपाचे झटके जाणवले. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. वाचा सविस्तर...

B'Day Spl: अमरीश पुरी यांच्या 'या' गाजलेल्या संवादाची आजही प्रेक्षकांवर भूरळ

मुंबई - कोणताही चित्रपट आणि अमरीश पुरी यांच्याशिवाय 'विलन' शब्द परिपूर्ण होऊ शकत नाही. खरंतर 'हिरो'ची ओळख निर्माण करण्यासाठी सिनेसृष्टीत आलेले अमरीश पुरी पुढे असे विलन बनले ज्यांची जागा आजही कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकापेक्षा एक सरस विलन साकारला आहे. हा विलन दरवेळी चित्रपटाच्या 'हिरो'वर भारी पडत असे. त्यामुळेच अमरीश पुरी हे नाव आजही प्रेक्षकांच्या मनात रुजलेले आहे. त्यांच्या कारकिर्दीतले बरेचसे चित्रपट त्यांच्यासाठी मैलाचा दगड ठरले. त्यापेक्षाही त्यांच्या संवादांनी चित्रपटगृह दणाणून जायचे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त पाहुयात त्यांचे हे खास संवाद... वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

Intro:Body:

Dumy 4

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.