ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाच्या नव्या 2 हजार 321 रुग्णांची नोंद, 42 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट बातमी

मुंबईत आज (शनिवारी) 2 हजार 321 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 67 हजार 608 वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत 27 हजार 626 सक्रिय रुग्ण आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 12, 2020, 10:30 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणांमुळे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. शनिवारी (दि. 12 सप्टें.) मुंबईत 2 हजार 321 नव्या कोरोनाग्रस्तांचनी नोंद झाली असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज (शनिवारी) कोरोनाचे 2 हजार 321 नवे रुग्ण आढळून आले असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 26 पुरुष तर 16 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 67 हजार 608 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 106 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 772 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 30 हजार 16 वर गेला आहे. सध्या मुंबईत 27 हजार 626 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 58 दिवस तर सरासरी दर 1.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 557 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 7 हजार 680 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 9 लाख 4 हजार 101 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या
दिनांकरुग्ण
2 सप्टेंबर1 हजार 622
3 सप्टेंबर1 हजार 526
4 सप्टेंबर1 हजार 929
5 सप्टेंबर1 हजार 735
6 सप्टेंबर1 हजार 910
7 सप्टेंबर1 हजार 788
8 सप्टेंबर1 हजार 346
9 सप्टेंबर2 हजार 227
10 सप्टेंबर2 हजार 172
11 सप्टेंबर2 हजार 321

हेही वाचा - राज्यात दिवसभरात कोरोनाचे २२ हजार ८४ नवे रुग्ण; ३९१ मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.