ETV Bharat / state

महाराष्ट्रात 2 हजार 630 नवे कोरोनाग्रस्त, 42 रुग्णांचा मृत्यू - Maharashtra corona news

राज्यात शनिवारी (दि. 30 जाने.) 2 हजार 630 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांचा एकूण आकडा 20 लाख 23 हजार 814 वर पोहोचला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 30, 2021, 8:07 PM IST

Updated : Jan 30, 2021, 10:38 PM IST

मुंबई - राज्यात शनिवारी (दि. 30 जाने.) 2 हजार 630 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 23 हजार 814 वर पोहोचला आहे. तर आज (30 जाने.) 42 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 042 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.23 टक्के तर मृत्यूदर 2.52 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

44 हजार 199 सक्रिय रुग्ण

राज्यात आज 1 हजार 535 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 27 हजार 335 वर पोहोचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 45 लाख 59 हजार 160 नमुन्यांपैकी 20 लाख 23 हजार 814 नमुने म्हणजेच 13.9 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 975 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 44 हजार 199 सक्रिय रुग्ण आहेत.

या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद

राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - शिक्षण शुल्क प्रकरण : शिवसेनाभवनावर संतप्त पालकांचा मोर्चा

Last Updated : Jan 30, 2021, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.