मुंबई - एकीकडे कोरोना नियंत्रणासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. अशात राज्यात आज कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १४७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ आहे. तर, सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३ हजार ८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २ हजार ८३२ इतके आहे. राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
राज्यात आज १३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू असे:
ठाणे- ९३ (मुंबई ५४, ठाणे ३०, वसई विरार १, कल्याण डोंबिवली ७, भिवंडी १), नाशिक- २४ (जळगाव १४, नाशिक ३, मालेगाव ८), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), कोल्हापूर- ५ (रत्नागिरी ५), औरंगाबाद-८ (औरंगाबाद ५, जालना १, परभणी २), लातूर- ३ (लातूर १, उस्मानाबाद १, नांदेड १), औरंगाबाद-१.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत. १३९ मृतांपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ७८ रुग्ण आहेत तर ५३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. याशिवाय ८ जण ४० वर्षांखालील आहेत. या १३९ रुग्णांपैकी ११० जणांमध्ये ( ७९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २८४९ झाली आहे.
*राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील*
*मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (४६,०८०), बरे झालेले रुग्ण- (१८,७७८), मृत्यू- (१५१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५,७६८)
*ठाणे: बाधीत रुग्ण- (११,८७७), बरे झालेले रुग्ण- (४४४५), मृत्यू- (२९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१४०)
*पालघर: बाधीत रुग्ण- (१२८५), बरे झालेले रुग्ण- (४६८), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७८०)
*रायगड: बाधीत रुग्ण- (१३६२), बरे झालेले रुग्ण- (७०४), मृत्यू- (५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०१)
*नाशिक: बाधीत रुग्ण- (१३६७), बरे झालेले रुग्ण- (९७८), मृत्यू- (८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०८)
*अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०४)
*धुळे: बाधीत रुग्ण- (१९५), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२)
*जळगाव: बाधीत रुग्ण- (८९६), बरे झालेले रुग्ण- (३७४), मृत्यू- (१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१३)
*नंदूरबार: बाधीत रुग्ण- (४०), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८)
*पुणे: बाधीत रुग्ण- (९०५१), बरे झालेले रुग्ण- (४८९३), मृत्यू- (३९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७६८)
*सोलापूर: बाधीत रुग्ण- (१२१७), बरे झालेले रुग्ण- (५७२), मृत्यू- (९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५१)
*सातारा: बाधीत रुग्ण- (५८७), बरे झालेले रुग्ण- (२५०), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१५)
*कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (६३०), बरे झालेले रुग्ण- (३०३), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२१)
*सांगली: बाधीत रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (७९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)
*सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (१७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८८)
*रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (१२९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०५)
*औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१७८१), बरे झालेले रुग्ण- (११४८), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४३)
*जालना: बाधीत रुग्ण- (१७०), बरे झालेले रुग्ण- (७८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८९)
*हिंगोली: बाधीत रुग्ण- (२०५), बरे झालेले रुग्ण- (१४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)
*परभणी: बाधीत रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
*लातूर: बाधीत रुग्ण- (१३२), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५)
*उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (१०६), बरे झालेले रुग्ण- (५३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०)
*बीड: बाधीत रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (३८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
*नांदेड: बाधीत रुग्ण- (१६२), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३)
*अकोला: बाधीत रुग्ण- (७२७), बरे झालेले रुग्ण- (४०५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८८)
*अमरावती: बाधीत रुग्ण- (२७५), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५)
*यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१६०), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)
*बुलढाणा: बाधीत रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (४८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१)
*वाशिम: बाधीत रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१)
*नागपूर: बाधीत रुग्ण- (६८१), बरे झालेले रुग्ण- (४११), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५९)
*वर्धा: बाधीत रुग्ण- (९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२)
*भंडारा: बाधीत रुग्ण- (३८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)
*गोंदिया: बाधीत रुग्ण- (६८), बरे झालेले रुग्ण- (५०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८)
*चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (३०), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)
*गडचिरोली: बाधीत रुग्ण- (४१), बरे झालेले रुग्ण- (२५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)
*इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (६५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७)
*एकूण: बाधीत रुग्ण-(८०,२२९), बरे झालेले रुग्ण- (३५,१५६), मृत्यू- (२८४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(४२,२१५)*
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३४७९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ०२६ सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी ६९.१८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.