ETV Bharat / state

मालाड येथे २ हजार १७० बेडचे जम्बो कोविड सेंटर, आज होणार लोकार्पण

author img

By

Published : Jun 28, 2021, 4:20 AM IST

Updated : Jun 28, 2021, 5:09 AM IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. आवश्यक यंत्रणा सुविधांसह सज्ज ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून मालाड येथे २ हजार १७० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

कोविड सेंटर
कोविड सेंटर

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. आवश्यक यंत्रणा सुविधांसह सज्ज ठेवली आहे. याचाच एक भाग म्हणून मालाड येथे २ हजार १७० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये १ हजार ५५० ऑक्सिजन बेड, १९० आयसीयू आणि पेडियाट्रिक वॉर्डमध्ये २५० बेड उपलब्ध असणार आहेत. या जम्बो कोविड सेंटरचे सोमवारी (दि. 28 जून) लोकार्पण होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मालाडमध्ये कोविड सेंटर

मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याने पालिकेने कोविड सेंटर उभारली. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने रुग्णालयासह कोविड सेंटरमधील बेड्सची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे पालिकेने आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर असणारे सहा जम्बो कोविड सेंटर सुरू केली. यामुळे दररोज हजारोंच्या संख्येने आढळणार्‍या रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध झाली. दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देखभाल-दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेल्या दहिसर, बीकेसी आणि मुलुंड कोविड सेंटरचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. गरज भासेल तेव्हा ही सेंटर सुरू केली जाणार आहेत. मालाडमध्ये भव्य कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. येथे २ हजार १७० बेड्स उपलब्ध होणार आहेत. यानंतर आता रेसकोर्स महालक्ष्मी, कांजूरमार्ग आणि भायखळा या ठिकाणी आणखी तीन जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे एकूण ५ हजार ५०० बेड उपलब्ध होणार आहेत.

लहान मुलांसाठी आयसीयू, पेडियाट्रिक वॉर्ड उपलब्ध

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटर सुरू करताना ७० टक्के ऑक्सिजन बेड, १० टक्के आयसीयू उपलब्ध करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे जम्बो सेंटरमध्ये लहान मुलांसाठी वॉर्ड असेल. पालकांना या ठिकाणी थांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा - कोरोनाच्या 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'चा धोका, राज्यात सोमवारपासून असतील 'हे' नियम

Last Updated : Jun 28, 2021, 5:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.