ETV Bharat / state

मुंबई महापालिकेच्या २६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, १०८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू - mumbai corona new cases news

कोरोना काळात मुंबईत स्वच्छता ठेवण्याचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करत आहेत. मात्र, या कामादरम्यान रुग्णाच्या संपर्कात आल्याने, रुग्ण असलेल्या ठिकाणी गेल्याने पालिकेच्या २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, १०८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पालिकेच्या एका उपायुक्ताचा तसेच एका सहाय्यक आयुक्ताचाही समावेश आहे.

मुंबई महापालिकेच्या २६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Jul 21, 2020, 9:50 PM IST

मुंबई : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने मुंबईला आपले हॉटस्पॉट बनवले आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या, शहरात स्वच्छता राखणाऱ्या सफाईचे कामगारांसह मुंबई महापालिकेच्या तब्बल २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, १०८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये पालिकेच्या एका उपायुक्ताचा तसेच एका सहाय्यक आयुक्ताचा समावेश आहे.

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. २२ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. देशभरात लॉकडाऊन सुरू असताना मुंबईत रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. या रुग्णांवर उपचार करण्याचे काम पालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स आदी कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. मुंबईत स्वच्छता ठेवण्याचे काम पालिकेचे सफाई कर्मचारी करत आहेत. तर, मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्याचे काम पालिका कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. लॉकडाऊन सुरू असताना रस्त्यावर राहणारे नागरिक, हातावर पोट असलेले कामगार, कोरोना झालेले रुग्ण, रुग्णाच्या संपर्कात असलेले संशयित रुग्ण आदींना रोज जेवणाची पाकीट पोहचवण्याचे काम पालिका कर्मचारी अधिकारी करत आहेत. रुग्ण आढळून आला त्या ठिकाणी औषध फवारणीचे कामही पालिका कर्मचारी करत आहेत. या कामादरम्यान रुग्णाच्या संपर्कात आल्याने, रुग्ण असलेल्या ठिकाणी गेल्याने पालिकेच्या २ हजार ६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, १०८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेचे उपायुक्त शिरीष दीक्षित आणि सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांचाही कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसाला ५० लाख रुपये आणि अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मृतांमध्ये आरोग्य, सफाई कामगारांची संख्या अधिक :

मुंबई महापालिकेच्या २६८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी १०८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये सर्वात जास्त सफाई आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पालिकेच्या एका उपायुक्ताचा तसेच एका सहाय्यक आयुक्ताचा समावेश आहे.

विभागांची नावे मृतांची संख्या
- खाते प्रमुख ३
- कर व संकलन विभाग २
- सफाई विभाग ३१
- आरोग्य विभाग २७
- अग्निशमन दल ८
- सुरक्षा विभाग ७
- परिमंडळ १ मध्ये ५
- परिमंडळ २ मध्ये ४
- इतर विभागातील २१
- एकूण १०८

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.