मुंबई - येथे कोरोनाचे नवे 1 हजार 314 रुग्ण आढळून आले असून 64 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 हजार 863 वर तर मृतांचा आकडा 1 हजार 700 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 22 हजार 38 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 26 हजार 125 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. त्यात आज काही प्रमाणात घट दिसून आली आहे. मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 1 हजार 314 रुग्ण आढळून आले आहेत. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 43 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. या मृतांमध्ये 44 पुरुष आणि 20 महिला रुग्णांचा समावेश आहे. या मृतांमध्ये 3 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 38 जणांचे वय 60 वर्षावर तर, 23 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.
मुंबईमधून आज 842 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 22 हजार 38 वर पोहचला आहे. सध्या मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 49 हजार 863 वर पोहोचला असून त्यापैकी 1 हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईमधून आतापर्यंत 22 हजार 38 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 26 हजार 125 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.