ETV Bharat / state

...ते 1 हजार 600 परप्रांतीय कामगार अखेर तामिळनाडूकडे रवाना

मध्य रेल्वेच्या वतीने मंगळवारी सकाळी 11.30 वाजता 'मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस' येथून 'मुंबई-तामिळनाडू' या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजुरांना केवळ तासभर आधीच रेल्वेच्या वतीने या विशेष रेल्वेबाबत माहिती देण्यात आली. यामुळे प्रवाशांची चांगचील धावपळ झाली होती. मात्र, खासदार राहुल शेवाळे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या काहींच्या मध्यस्तीनंतर रेल्वे सांयकाळी 5.30 वाजता सीएसटी येथून तामिळनाडूकडे रवाना करण्यात आली.

ते 1600 कामगार अखेर तामिळनाडूकडे रवाना
ते 1600 कामगार अखेर तामिळनाडूकडे रवाना
author img

By

Published : May 27, 2020, 4:31 PM IST

मुंबई - सरकार आणि राज्य सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे परप्रांतीय मजुरांच्या हाल-अपेष्टा वाढत आहेत. मुंबईहून मंगळवारी तामिळनाडूकडे रवाना होणाऱ्या 1 हजार 600 मजुरांना, रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला होता. मात्र, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मध्यस्तीनंतर या मजुरांना दिलासा मिळाला. मंगळवारी दिवसभराच्या गदारोळानंतर अखेर तामिळनाडूकडे रवाना झालेल्या मजुरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

स्वगृही परतण्याकरता सज्ज परप्रांतीय प्रवासी

मुंबईत रोजंदारीचे काम करणारे तामिळनाडूमधील सुमारे 1 हजार 600 मजूर लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडले. रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या नियमानुसार, या मजुरांनी मुंबईहून तामिळनाडू येथे जाण्यासाठी, 'महाराष्ट्र स्टेट तामिळ संघम'च्या माध्यमातून रितसर अर्ज केला होता. यानुसार मध्य रेल्वेच्या वतीने मंगळवारी 26 मे रोजी सकाळी 11.30 वाजता 'मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस' येथून 'मुंबई-तामिळनाडू' या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या मजुरांना केवळ तासभर आधीच रेल्वेच्या वतीने या विशेष रेल्वेबाबत माहिती देण्यात आली.

मुंबई शहर आणि उपनगरांत राहणाऱ्या या मजुरांना केवळ तासाभरात सीएसटी स्थानक गाठणे शक्य नव्हते. आपली ट्रेन आता हुकणार किंवा रद्द होणार या भीतीने हे मजूर गोंधळून गेले. त्यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्याशी संपर्क साधला आणि मदत करण्याची विनंती केली. खासदार शेवाळे यांनी परिवहन मंत्री आणि रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून संबधित विशेष रेल्वेची, 11.30 ची वेळ संध्याकाळी 5 वाजता करण्याची विनंती केली, जेणेकरून सर्व मजुरांना ही रेल्वे पकडणे शक्य होईल. खासदार शेवाळे यांच्या विनंतीमुळे अखेर ही रेल्वे सांयकाळी 5.30 वाजता सीएसटी येथून तामिळनाडूकडे रवाना करण्यात आली.

दरम्यान या मजुरांना दुपारचे जेवण आणि पाणी पुरविण्याची व्यवस्थाही करण्यात आली. विशेष रेल्वे सुटण्याच्या केवळ तासभर आधी रेल्वेच्या वतीने कळविण्यात आल्याने मजुरांचा मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, खासदार शेवाळे, परिवहनमंत्री अनिल परब यांनी तत्परतेने केलेल्या मदतीमुळेच हे 1 हजार 600 मजूर आपल्या गावाकडे रवाना होऊ शकले आहेत. कष्टकरी आणि सामन्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या शिवसेनेचे मी आभार मानतो असे महाराष्ट्र स्टेट तामिळ संघमचे अध्यक्ष एस. अण्णामलाई यांनी या शब्दात आपले भाव व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.