मुंबई - राज्यात मागील 24 तासांत 9 हजार 677 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 60 लाख 17 हजार 35 झाली आहे. शुक्रवारी (दि. 25 जून) 156 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 20 हजार 360 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झआला आहे.
आतापर्यंत 57 लाख 72 हजार 799 रुग्ण झाले कोरोनामुक्त
मागील 24 तासांत 10 हजार 138 रुग्णांन कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या संख्या 57 लाख 72 हजार 799 वर पोहोचली आहे. राज्यात 1 लाख 20 हजार 715 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे चित्र दिसत असतानाच तिसऱ्या लाटेची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटचे आव्हान आरोग्य यंत्रणाेसमोर उभा राहिला आहे. यामुळे राज्य सरकारकडून नियमावलीतही बदल करण्यात आले आहे. पाच टप्प्यांची नियमावली बदलली असून आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या नियमावलीनुसारच सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. असले तरी राज्यात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारी चढ-उतार दिसून येत आहे.
हेही वाचा - MAHARASHTRA CORONA RESTRICTIONS : सरकारच्या नवीन नियमांवर व्यापारी नाराज