मुंबई - राज्यात गुरुवारी (दि. ५ ऑगस्ट) ६ हजार ६९५ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून तसेच १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज ७ हजार १२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात ७४ हजार ९९५ सक्रिय रुग्ण
राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख २४ हजार २७८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३३ हजार ५३० मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८९ लाख ६२ हजार १०६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ३६ हजार २२० (१२.९४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ४६ हजार ५०१ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात ७४ हजार ९९५ सक्रिय रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.१ टक्के
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
रुग्णसंख्येत चढउतार
राज्यात मागील महिन्यात १, ६ आणि १८ जुलै रोजी कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची तर १९ जुलै रोजी ६ हजार १७ रुग्णांची नोंद झाली. रविवारी रुग्णसंख्येत किंचित घट होऊन ६ हजार ४७९ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी त्यात घट होऊन ४ हजार ८६९ रुग्ण आढळून आले. मंगळवारी त्यात वाढ होऊन ६ हजार ५ तर बुधवारी ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज त्यात आणखी वाढ होऊन ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ३२७
रायगड - १७२
पनवेल पालिका - १०१
अहमदनगर - ७९९
पुणे - ५५४
पुणे पालिका - २६९
पिपरी चिंचवड पालिका - २०२
सोलापूर - ५७४
सातारा - ९५१
कोल्हापूर - ७१५
कोल्हापूर पालिका - १०५
सांगली - ५६८
सांगली मिरज कुपवाडा पालिका - १०४
सिंधुदुर्ग - १०९
रत्नागिरी - १७०
बीड - १९६
हेही वाचा - एक्स्प्रेसमधून दारुची तस्करी करणाऱ्या तिघांना बेड्या, 1 हजार 498 विदेशी दारुच्या बाट्या जप्त