ETV Bharat / state

vaccination : मुंबईत शुक्रवारी 79 हजार 721 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबईत शुक्रवारी (दि. 25 जून) 79 हजार 721 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 49 लाख 39 हजार 259 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण
लसीकरण
author img

By

Published : Jun 26, 2021, 1:35 AM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या आठवड्यात तीन दिवस दररोज एक लाखाच्यावर लसीकरण झाले होते. त्यात काही प्रमाणात घट झाली असून शुक्रवारी (दि. 25 जून) 79 हजार 721 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 49 लाख 39 हजार 259 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू झाले असले तरी राज्य सरकारच्या निर्णयानुसार 30 ते 44 वयोगटातील लसीकरण केले जात आहे. तसेच परदेशात जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त परदेशात जाणारे नागरिक, ऑलम्पिकसाठी जाणारे खेळाडू यांचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जात आहे.

एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी - 3 लाख 15 हजार 725
फ्रंटलाईन वर्कर - 3 लाख 71 हजार 188
जेष्ठ नागरिक - 13 लाख 84 हजार 560
45 ते 59 वय - 14 लाख 52 हजार 857
18 तर 44 वय - 14 लाख 6 हजार 780
स्तनदा माता - 3 हजार 204
परदेशी शिक्षण विद्यार्थी - 4 हजार 937
मानसिक रुग्ण - 8
एकूण - 49 लाख 39 हजार 259

हेही वाचा - Mumbai corona update : शुक्रवारी 693 नव्या रुग्णांची भर, 20 मृत्यूची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.