ETV Bharat / state

राज्यात आतापर्यंत 17 हजार 975 कोरोना योद्धे बाधित तर 168 डॉक्टरांनी गमावला जीव - मुंबई कोरोना बातमी

कोरोनाचा शिरकाव राज्यात झाल्यापासून ते आता दुसऱ्या लाटेत हजारो नागरीक बाधित होत आहेत. रोज शेकडो जीव जात आहेत. असे असताना कोरोना रुग्णांवर उपचार करणारे, त्यांची सेवा करणारे कोरोना योद्धे अर्थात डॉक्टर आणि नर्सही मोठ्या संख्येने बाधित होताना दिसत आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यात 17 हजार 975 कोरोना योद्धे कोरोना बाधित झाले असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 17, 2021, 3:46 PM IST

Updated : Apr 17, 2021, 5:06 PM IST

मुंबई - कोरोनाचा शिरकाव राज्यात झाल्यापासून ते आता दुसऱ्या लाटेत हजारो नागरीक बाधित होत आहेत. रोज शेकडो जीव जात आहेत. असे असताना कोरोना रुग्णांवर उपचार करणारे, त्यांची सेवा करणारे कोरोना योद्धे अर्थात डॉक्टर आणि नर्सही मोठ्या संख्येने बाधित होताना दिसत आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यात 17 हजार 975 कोरोना योद्धे कोरोना बाधित झाले असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 17 हजार 985 पैकी 168 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात 107 सरकारी डॉक्टर असून 71 डॉक्टर खासगी आहेत.

माहिती देताना डॉ. रामकृष्ण लोंढे

4 हजार 216 नर्सही बाधित

राज्य सरकारकडून आयएमएला प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील 17 हजार 975 डॉक्टर आणि नर्स बाधित झाले आहेत. यात 11 हजार 235 कोरोना योद्धे सरकारी असून 6 हजार 740 खासगी आहेत. डॉक्टरांची आकडेवारी लक्षात घेता 5 हजार 913 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 2 हजार 814 खासगी डॉक्टर असून सरकारी डॉक्टरांची संख्या 3 हजार 95 इतकी आहे. तर बाधित 168 डॉक्टरांचा मृत्यू झाला असून यात 71 खासगी तसेच 168 सरकार-पालिका रुग्णांचा समावेश आहे. तर दुसरीकडे या 17 हजार 975 रुग्णांमध्ये 4 हजार 216 नर्स असून 7 हजार 845 पॅरामेडिकल स्टाफ असल्याचेही, डॉ लोंढे यांनी सांगितले आहे.

देशात 747 आयएमए डॉक्टरांचा मृत्यू

राज्यात 17 हजाराहून अधिक कोरोना योद्धे बाधित झाले असून यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. असे असताना आता आयएमएनेही आपली आकडेवारी जाहीर केले असून ही आकडेवारी गंभीर आहे. कारण देशभरातील 747 आयएमए डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 71 खासगी डॉक्टरांची नोंद असली तरी आयएमएच्या आकडेवारीनुसार राज्यात 74 आयएमए डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. तर उर्वरित डॉक्टर हे बंगालमधील 85, आंध्र प्रदेशमधील 70, उत्तर प्रदेशातील 66, कर्नाटकमधील 68, गुजरातमधील 62, बिहारमधील 22, दिल्लीतील 22, आसाम 20 आणि पंजाब 20, असे आहेत. दरम्यान, खासगी डॉक्टरांना 50 लाखांच्या विम्याचा लाभ मिळावा, अशी सुरुवातीपासून आयएमएची मागणी आहे. पण, याकडे केंद्र सरकारने कानाडोळा केल्याचे दिसत आहे. तर मुंबई उच्च न्यायालयानेही खासगी डॉक्टरांना विमा लागू नसल्याचा निर्णय दिला आहे. असे असले तरी आता पुन्हा एकदा आयएमएने विमा मिळावा, अशी मागणी उचलून धरली आहे. केंद्र सरकारच्याच हातात हा निर्णय असून त्यांनी आम्हाला दिलासा द्यावा, असेही डॉ. लोंढे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात समुद्रामार्गे येणार ऑक्सिजन; राज्य सरकारच्या हालचाली सुरू

Last Updated : Apr 17, 2021, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.