मुंबई - मुंबईत आज (दि. 9 मार्च) 1 हजार 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 35 हजार 584 वर पोहोचला आहे. आज (दि. 9 मार्च) दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 506 वर पोहोचला आहे.
10 हजार 736 सक्रिय रुग्ण
आज 1 हजार 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 12 हजार 458 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 10 हजार 736 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 219 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 21 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 214 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 34 लाख 54 हजार 129 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.
रुग्णसंख्या वाढली
मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 दरम्यान रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760, 23 फेब्रुवारीला 643, 24 फेब्रुवारीला 1 हजार 167, 25 फेब्रुवारीला 1 हजार 145, 26 फेब्रुवारीला 1 हजार 34, 27 फेब्रुवारीला 987, 28 फेब्रुवारीला 1 हजार 51, 1 मार्चला 855, 2 मार्चला 849, 3 मार्चला 1 हजार 121, 4 मार्चला 1 हजार 103, 5 मार्चला 1 हजार 173, 6 मार्च 1 हजार 188, 7 मार्चला 1 हजार 360, 8 मार्चला 1 हजार 8, 9 मार्चला 1 हजार 12 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद
मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - लसीकरणादरम्यान वृद्धाचा मृत्यू, महापालिकेकडून समिती गठीत
हेही वाचा - VIDEO : मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरून विधानसभेत गृहमंत्री-फडणवीसांमध्ये खडाजंगी