ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 1431 नवे रुग्ण, 49 रुग्णांचा मृत्यू - मुंबई कोरोना अपडेट

मुंबईत रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट होत आहे. आज 1431 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1470 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

mumbai latest news
मुंबईत कोरोनाचे 1431 नवे रुग्ण, 49 रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : May 23, 2021, 8:46 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट होत आहे. आज 1431 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1470 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 331 दिवस -

मुंबईत आज 1 हजार 431 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 97 हजार 810 वर पोहचला आहे. आज 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 626 वर पोहचला आहे. 1 हजार 470 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 52 हजार 686 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 28 हजार 410 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 331 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 53 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 219 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 23 हजार 314 तर आतापर्यंत एकूण 60 लाख 72 हजार चाचण्या करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - बुलडाण्यात ओशाळली माणुसकी! बिलाच्या पैशांसाठी रुग्णालयाने ठेऊन घेतले मंगळसूत्र!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.