ETV Bharat / state

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 'रेकॉर्ड ब्रेक' लसीकरण, एका दिवसात 1 लाख 13 हजार नागरिकांना लस

मुंबईत मंगळवारी (दि. 22 जून) सलग दुसऱ्या दिवशी 1 लाख 13 हजार 135 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 46 लाख 84 हजार 50 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 23, 2021, 4:36 AM IST

Updated : Jun 23, 2021, 5:19 AM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. योग दिनाचे औचित्य साधून सोमवारपासून ( 21 जून) 30 ते 44 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाला या वयोगटातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने दिवसभरात सोमवारी 1 लाख 8 हजार 148 लसीचे डोस देण्यात आले होते. मंगळवारी (दि. 22 जून) सलग दुसऱ्या दिवशी 1 लाख 13 हजार 135 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 46 लाख 84 हजार 50 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत मंगळवारी 1 लाख 13 हजार 135 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 96 हजार 325 लाभार्थ्यांना पहिला तर 16 हजार 820 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 46 लाख 84 हजार 50 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 37 लाख 72 हजार 240 लाभार्थ्यांना पहिला तर 9 लाख 11 हजार 810 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 14 हजार 596, फ्रंटलाईन वर्करना 3 लाख 69 हजार 519, जेष्ठ नागरिकांना 13 लाख 63 हजार 740, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 14 लाख 8 हजार 527 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 12 लाख 20 हजार 40, 3 हजार 143 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 4 हजार 485 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

रेकॉर्ड ब्रेक

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान सुरुवातीला दिवसाला 40 ते 50 हजार लसी दिल्या जात होत्या. गेल्या काही दिवसात 70 ते 93 हजार लसीकरण केले जात होते. सोमवारी 1 लाख 8 हजार 148 लसीचे डोस देण्यात आले होते. मंगळवारी 1 लाख 13 हजार 135 लसीचे डोस देण्यात आले. 16 जानेवारीपासून आतापर्यंतचे हे सर्वाधिक लसीकरण आहे.

लसीकरण मोहीम

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मेपासून 18 ते 45 वर्षांमधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. राज्यात लसीचा पुरवठा होत नसल्याने अनेक वेळा लसीकरण ठप्प झाले आहे. 21 जूनपासून राज्यात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मुंबईत सध्या 50 टक्के वॉकइन तर 50 टक्के नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिला, परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणारे विद्यार्थी, परदेशात नोकरी करण्यासाठी जाणारे नागरिक, ऑलम्पिकमध्ये भाग घेणारे खेळाडू आदींचे लसीकरण केले जात आहे.

एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी - 3 लाख 14 हजार 596

फ्रंटलाईन वर्कर - 3 लाख 69 हजार 519

ज्येष्ठ नागरिक - 13 लाख 63 हजार 740

45 ते 59 वय - 14 लाख 8 हजार 527

18 तर 44 वय - 12 लाख 20 हजार 40

स्तनदा माता - 3 हजार 143

परदेशी शिक्षण विद्यार्थी - 4 हजार 485

एकूण - 46 लाख 84 हजार 50

हेही वाचा - देवस्थान अध्यक्षपद नियुक्ती: शिर्डीतील साईबाबांचा राष्ट्रवादीला आशीर्वाद, तर काँग्रेसला पावला विठ्ठल!

Last Updated : Jun 23, 2021, 5:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.