ETV Bharat / state

राज्यात ४ हजार २६ नवीन कोरोनाग्रस्तांचे निदान, ५३ रुग्णांचा मृत्यू - कोरोना बातमी

राज्यात मंगळवारी ४ हजार २६ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. एकूण कारोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख ५९ हजार ३६७ वर पोहोचला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 8, 2020, 10:30 PM IST

मुंबई - आज मंगळवारी (दि. ८ डिसें.) राज्यात ४ हजार २६ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख ५९ हजार ३६७ वर पोहोचला आहे. राज्यात आज (दि. ८ डिसें.) ५३ करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार ८२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ७३ हजार ३७४ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

१ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ जणांची झाली तपासणी

राज्यात मंगळवारी (दि. ८ डिसें.) ६ हजार ३६५ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १७ लाख ३७ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात मंगळवारी ५३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १३ लाख ७७ हजार ७४ नमुन्यांपैकी १८ लाख ५९ हजार ३६७ नमुने म्हणजेच १६.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४८ हजार ९६१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ५ हजार ६१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कधी किती रुग्ण आढळून आले

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५ हजार ९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३ हजार ६४५, ७ नोव्हेंबरला ३ हजार ९५९, १० नोव्हेंबरला ३ हजार ७९१, १५ नोव्हेंबरला २ हजार ५४४, १६ नोव्हेंबरला २ हजार ५३५, १७ नोव्हेंबरला २ हजार ८४०, २० नोव्हेंबरला ५ हजार ६४०, तर २१ नोव्हेंबरला ५ हजार ७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - ॲमेझॉनला मराठी नको, मग आम्हालाही महाराष्ट्रात अ‌ॅमेझॉन नको; मनसेचा इशारा

हेही वाचा - विकासकांकडील 320 कोटी रुपये 'बेस्ट'ने वसूल करावे, विरोधी पक्षनेत्यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.