ETV Bharat / state

लॉकडाऊनचा फटका; देशातील 4 लाख 22 हजार घरांचा ताबा मिळण्यास होणार विलंब - home construction pending lockdown effect

देशात घरांच्या टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे साहजिकच घरांना मोठी मागणी असल्याने देशात दरवर्षी मोठ्या संख्येने नवनवीन गृहप्रकल्प हाती घेतले जातात. मोठ्या संख्येने घरांचे बांधकाम सुरू असते. तर बांधकाम वेळेत पूर्ण करत घराचा ताबा वेळेत देण्याचा बिल्डरांचा प्रयत्न असतो.

house project
घरे प्रकल्प
author img

By

Published : May 18, 2021, 3:24 PM IST

मुंबई - मार्च 2020पासून देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्था आणि सर्व घटकांना बसला आहे. त्यानुसार बांधकाम क्षेत्रालाही याची मोठी झळ सोसावी लागत आहे. आजच्या घडीला देशभरातील तब्बल 4 लाख 22 हजार घरांचे बांधकाम रखडले आहे. या घरांचे काम मे महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता ही घरे डिसेंबर 2021मध्ये पूर्ण होण्याची शक्यता एनारॉक प्रॉपर्टी कंसल्टेंट्सने व्यक्त केली आहे.

देशातील सात ठिकाणचे काम रखडले -

देशात घरांच्या टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे साहजिकच घरांना मोठी मागणी असल्याने देशात दरवर्षी मोठ्या संख्येने नवनवीन गृहप्रकल्प हाती घेतले जातात. मोठ्या संख्येने घरांचे बांधकाम सुरू असते. तर बांधकाम वेळेत पूर्ण करत घराचा ताबा वेळेत देण्याचा बिल्डरांचा प्रयत्न असतो. अशावेळी गेल्या वर्षभरापासून देशातील 4 लाख 22 हजार घरांचे बांधकाम संथ गतीने सुरू आहेत तर काही प्रकल्प रखडले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका या कामांना बसला आहे. मजुरांची कमतरता आणि आर्थिक अडचणीमुळे काम रखडत असल्याचे चित्र आहे. ही रखडलेली 4 लाख 22 हजार घरे देशातील 7 प्रमुख शहरातील आहेत. यात दिल्ली आणि आसपासच्या भागातील (एनसीआर) 1 लाख 16 हजार 730, मुंबई महानगर प्रदेशा (एमएमआर) तील 1 लाख 9 हजार 940, बंगळुरुतील 56 हजार 680, पुण्यातील 74 हजार 200, कोलकात्यातील 27 हजार 470, चेन्नईतील 21 हजार 830 तर हैदराबादमधील 15 हजार 860 अशा एकूण 4 लाख 22 हजार 500 घरांचा समावेश आहे. या रखडलेल्या घरांपैकी 73 टक्के घरे विकली गेली आहेत. तर यातील मध्यम गटातील घरे मोठ्या संख्येने आहेत. ऍनारॉकच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. घराचे काम रखडल्याने एकीकडे बिल्डरांचे नुकसान होत आहे तर दुसरीकडे ग्राहकांना ही याचा फटका बसत आहे. त्यांना घराचा ताबा मिळवण्यासाठी आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा - 'तौक्ते'चा रायगडला तडाखा; चौघांचे बळी, ५२४४ घरांचे नुकसान

ताबा मिळण्यास किमान सहा महिन्यांचा विलंब -

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घरांचे बांधकाम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मे 2021मध्ये जी 4 लाख 22 हजार घरे बांधून पूर्ण होणार होती, त्या सर्व घरांचे काम अपूर्ण आहे. आता हे काम डिसेंबर 2021पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती ऐनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली आहे. कोरोनाचा कहर थांबला नाही, तिसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन झाले तर आणखी फटका या कामाला बसेल आणि घरांच्या पूर्णत्वाच्या डेडलाईन 2022पर्यंत ही जाऊ शकतात, अशी शक्यता ही त्यांनी वर्तवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.